आता बाजारात तुरीच्या शेंगा बाजारात दिसत आहेत.
विदर्भात तुरीचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. हिवाळा आला की, विदर्भात तुरीच्या शेंगांवर जोर असतो, मग त्याच्या दाण्याचा भात, मुगाची तुर दाणे घालुन फोडणीची खिचडी असो का तुर दाण्याची उसळ, आळण, आमटी
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही पदार्थ तुरीच्या दाण्याचे
तुरीच्या दाण्याचा झुणका
साहित्य : २ वाटय़ा तुरीचे दाणे, २ उभे कापलेले कांदे, ५ ते ६ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, पाव वाटी बारीक कापलेली कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, ४ ते ५ कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम तुरीचे दाणे धुवून मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यावेत. कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदे, मिरची फोडणीत टाकावे. कांदा २,३ मिनिटे परतल्यावर हळद व चवीनुसार मीठ टाकावं. बारीक केलेले तुरीचे दाणे टाकून ते व्यवस्थित परतून गॅस कमी करून शिजू द्यावेत. शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकावी. हा झुणका गरम गरम भाकरीसोबत छान लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तुरीच्या दाण्यांची आमटी
साहित्य:- २ वाटय़ा तुरीचे दाणे, १ बारीक चिरलेला कांदा, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, १ बारीक चिरलेला टोमॅटो, दीड चमचा धणोपुड, १ चमचा जिरेपुड, अर्धा चमचा हळद, आलं-लसूण पेस्ट, जिरे, हिंग, मोहरी, तेल, मीठ, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी.
कृती:- प्रथम एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून जिरे, लसूण, मिरची व तुर दाणे टाकावे. दाणे पाच मिनिटं परतून थंड करून घ्यावे. मिक्सरमधे बारीक वाटावे. एका कढईत तेल गरम करून फोडणीत कांदा घालावा. गुलाबीसर परतून आलं-लसूण पेस्ट, तिखट, हळद, धणो, जिरेपूड टाकून परतून घ्यावं. टोमॅटो, मीठ, कोथिंबीर टाकून परत परतून घ्यावं. त्यात वाटलेले दाणे टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावं. गॅस कमी करून झाकण ठेवून मिश्रण दोन मिनिटं शिजू द्यावं. झाकण काढून त्यात गरम केलेलं पाणी टाकावं. आमटीला उकळी येऊ द्यावी. गॅस बंद केल्यावर वरून कोथिंबीर टाकावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तुरीच्या दाण्याचे कढीगोळे
साहित्य:- (गोळ्यांसाठी)- २ वाटय़ा तुरीचे दाणे, अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या, २ चमचे ज्वारीचं पीठ आणि मीठ.
कढीसाठी:- २ वाटय़ा आंबट दही, २ चमचे बेसन, २ हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पानं.
कृती : प्रथम तुरीचे दाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत. त्यात बारीक चिरलेली मेथीची भाजी, ज्वारीचं पीठ, मिरची, मीठ टाकावं. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. त्याचे छोटे छोटे गोळे करून चाळणीत ठेवून वाफवून घ्यावेत. कढी करावी. उकळी आल्यावर वाफवलेले गोळे टाकून गॅस कमी करून 7-8 मिनिटं गोळे शिजू द्यावेत. वरून कोथिंबीर टाकावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तुरीच्या दाण्यांचा गोळाभात
साहित्य : २ वाटय़ा तांदूळ, २ वाटय़ा तुरीचे दाणे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, पाव वाटी खोब:याचा कीस, २ चमचे धणोपूड, १ चमचा जिरेपुड, अर्धा चमचा तिखट, कोथिंबीर, लिंबू आणि मीठ.
फोडणीसाठी : ३ ते ४ सुक्या लाल मिरच्या, १-२ तेजपान, अर्धा चमचा जिरे, २-3 लवंगा, तेल, हिंग, १ वाटी पाणी.
कृती : प्रथम तांदूळ धुवून भिजवून ठेवावेत. एका कढईत १ चमचा तेल टाकून त्यात तुरीचे दाणे परतून घ्यावेत. मिक्सरमधून बारीक करून त्यात शेंगदाण्याचा कूट, खोब:याचा कीस, धने, जिरेपुड, तिखट, मीठ, कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. त्याचे लिंबाएवढे गोळे करून घ्यावेत. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे, तेजपान, लाल मिरची, लवंग टाकावी. नंतर तांदूळ टाकावेत. ते दोन मिनिटं व्यवस्थित परतून घ्यावेत. नंतर त्यात गरम पाणी टाकावं. मीठ व लिंबू पिळून तयार केलेले गोळे टाकून हलक्या हातानं चमचा फिरवावा. उकळी आल्यावर गॅस कमी करून मंद आचेवर भात शिजू द्यावा. भात शिजला की कोथिंबीर टाकावी. खायला देताना भातावर जिवंत फोडणी घालावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply