साहित्य : वरई तांदळाचे पीठ आवश्यक इतके, वाटीभर गूळ, तांबड्या भोपळ्याच्या फोडी एक वाटीभर, थोडे मीठ, तूप.
कृती : भोपळा फोडी वाफवून चाळणीत निथळत ठेवा. गूळ बारीक चिरा, मग गूळ, भोपळा फोडी व थोडे मीठ एकत्र करा. यात मावेल, भिजेल तितकेच वरई पीठ घाल. सैलसर मळून घ्या. मग तव्याला हलकासा तुपाचा हात चोळा. नेहमीसारखे त्यावर थालीपीठ लावा. मंद आचेवर तवा ठेवून दोन्ही बाजू लालसर भाजा. कडेने थोडे थोडे तूप सोडावे. गरम गरम खा.
Leave a Reply