फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या, ३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून, चवीपुरते मीठ, चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती: वांगे भाजून घ्यावे. वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने रफली चिरावे. कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे. कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे. मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही. कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे (साधारण ५ ते ८ मिनिटे) गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.
Leave a Reply