तांदूळ शिजविण्याकरिता साहित्य:- बासमती तांदूळ ३ कप, विलायची लवंग प्रत्येकी ४, दालचिनी २ ते ३ तुकडे, तेजपत्ता १, मीठ १/२ टी स्पून, तूप किंवा तेल २ ते ३ टी स्पून .
वाटण्याच्या मसाल्याचे साहित्य:- कांदे २, लसूण ५ ते ६ कळ्या, किसलेले अद्रक १ टी स्पून, हिरव्या मिरच्या २ ते ३ ताज्या पुदिनाची पाने १० ते १२, ओल्या नारळाचा किस २ टी स्पून, सोफ १ टी स्पून, तिखट १ टी स्पून, हळद १/२ टी स्पून धने जीरे पावडर २ टी स्पून, गरम मसाला पाव टी स्पून.
बिर्याणी करिता साहित्य :- पाणी काढलेले घट्ट दही १/२ कप, दुधावरील ताजी साय २ टी स्पून मध्यम आकारात चिरलेल्या मिक्स भाज्या २ कप, (गाजर, पत्ताकोबी, घेवडा/ सिमला मिरची इ. ) ताजे मटारचे दाणे पाव कप, दूध ४ टी स्पून, केशराच्या काड्या १० ते १५, बटाटे लांब कापलेले २, कांदे लांब कापलेले ३, तूप ४ ते ५ टी स्पून, काजू १० ते १५, किसमीस १५ ते २०, मीठ-साखर स्वादानुसार.
कृती :- तांदूळ धुऊन १० मिनिटेे भिजत ठेवावेत. त्यांत तांदूळ शिजविण्यास लागणारे सर्व साहित्य आणि ६ कप पाणी घालून भात शिजवून घ्यावा व मोठ्या थाळीत पसरवून हाताने थोडा मोकळा करून घ्यावा व थंड करावा.
वाटणाचा सर्व मसाला एकत्र करून बारीक वाटून घ्या नंतर या वाटणांत दही, दुधाची साय, चिरलेल्या भाज्या, मटर मिक्स करून घ्यावे. दूध थोडे गरम करून त्यांत केशर काड्या घालून ठेवा.
तेल गरम करून त्यांत लांब कापलेले बटाटे, कांदे एक-एक करीत तळून घ्या तसेच काजू किसमीस पण तळून घ्या. उरलेल्या तेलात वाटणात मिक्स केलेल्या भाज्या तेल सुटे स्तोवर परतवून घ्याव्यात. स्वादानुसार मीठ साखर घाला. शिजलेल्या भाताचे सारखे तीन भाग करा एका खोल बेकिंग ट्रे ला तूप लावून घ्यावे. त्यात खाली थोडे तळलेले बटाटे, कांदे, काजू आणि किसमीसची लेअर दयावी. त्यावर एक भाग भाताचा पसरवावा या भाताच्या लेअरवर तयार भाजीची लेअर द्यावी. पुन्हा त्यावर भातानी आणि भातावर भाजीची लेअर द्यावी व परत वर भाताची लेअर द्यावी. वरील लेअरवर उरलेले बटाटे व कांद्याची लेअर द्यावी. काजू-बेदाणे आणि केशर घालावे व फॉईलने कव्हर करून ओव्हनमध्ये १८० सेल्सि. वर १० मिनिटे बिर्याणी बेक करावी. सर्व्ह करते वेळी रायता आणि पापडासोबत बिरयानी सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply