साहित्य : एक वाटी बासमती तांदूळ धुवून २ वाटी पाणी घालून बाजूला ठेवा. अर्धा तास. एक वाटी चिरलेल्या कच्च्या भाज्या (बटाटा, वाटाणा, फरसबी, कांदा, गाजर), एक टीस्पून अख्खा गरम मसाला, मीठ. (तुपाची/ तेलाची जिरे व मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी).
कृती : काचेच्या मोठय़ा भांडय़ात सर्व भाज्या, फोडणी व पाण्यासकट तांदूळ, अख्खा गरम मसाला, मीठ सर्व एकत्र करून अर्धवट झाकण लावून १०० टक्के पॉवरवर ४ मिनिटे शिजू द्या. नंतर परत ३० टक्के पॉवरवर १२ मिनिटे अर्धवट झाकून तांदूळ शिजू द्या. १० मिनिटे बंद पॉवरवर आतच भात राहू द्या. (स्टॅण्डिंग टाइम). टिप्स : १) जर १२ मिनिटांनी भात शिजलेला वाटत नसेल तर परत २ मिनिटे ३० टक्के पॉवरवर भात शिजू देणे.२) भाज्या न घालता नुसता जिरा राइस पण करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply