साहित्य : ४ शिजवलेले मोठे बटाटे,४ ते ५ हिरव्या मिरच्या, तेल, ४-५ लसणींची पेस्ट, १ इंच आले पेस्ट, ३-४ कढीपत्ता पाने, २ टेस्पून कोथिंबीर, १ टेस्पून लिंबाचा रस, मोहोरी, जिरे, चिमूटभर हिंग, हळद, चवीपुरते मीठ.
आवरणासाठी : चणा पिठ, पाणी, हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा.
कृती : शिजवलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घ्यावे. कढईत २ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्या आणि नंतर आले-लसूण पेस्ट घालावी. थोडे परतून त्यात उडीद डाळ घालावी. उडीद डाळ गोल्डन ब्राउन झाली कि त्यात कुस्करलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मीठ घालावे. मीठ आणि फोडणीचे तेल बटाट्याला व्यवस्थित लागेल असे कालथ्याने मिक्स करावे. लिंबूरस घालावा. तयार भाजीचे गोळे करावे. भाजी तयार झाली कि आवरणासाठी चणा पिठ पाण्यात भिजवावे. अर्धा चमचा हळद, सोडा आणि चवीपुरते मिठ घालावे. पिठ अगदी पातळ किंवा अगदी घट्ट भिजवू नये. कढईत तेल गरम करावे. भिजवलेल्या पिठात तयार भाजीचा एक गोळा बुडवून तेलात सोडावा. असे तिन चार वडे गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळावेत. कोथिंबीर मिरचीच्या हिरव्या चटणीबरोबर किंवा लसणीच्या तिखटाबरोबर गरमागरम खावेत.
Leave a Reply