अख्ख्या मसुराची उसळ
साहित्य : उसळीसाठी दोन वाट्या अख्खे मोड आलेले मसूर (दोन दिवस आगोदर भिजत घालून मोड आणून घ्या म्हणजे उसळ जास्त पौष्टिक होईल) ,दोन मध्यम आकाराचे कांदे , दोन मध्यम आकाराचे टोमॅटो , सुके किसलेले गोटाखोबरे भाजून घेऊन,जिरे भाजून घेऊन, १० / १२ लसुण पाकळ्या , एक टेबलस्पुन
गरम मसाला , चवीनुसार लाल तिखट , अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट (जास्त झाले तरी चवीत फारसा फरक पडत नाही कारण हे फार तिखट नसतेच) , चवीप्रमाणे मीठ व साखर किंवा गूळ,चिंच किंवा आमसुल ,फोडणीसाठी जीरे – फोडणीसाठी तेल,बारीक चिरलेली
कोथींबीर
कृती : उसळ करण्यापूर्वी मोड आलेले अख्खे मसुर ३ ते ४ तास साधारण कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. (यामुळे शिजण्याचा वेळ वाचतो),मग कांदा, टोमॅटो, बारीक चिरुन घ्या,लाकडी पोळपाटावर लसुण ठेचुन घ्या,गॅसवर एका
कढईत तेल तापवुन त्यात जीरे, लसुण आणि कांदा घालाघालून कांदा शिजेपर्यंत मध्यम आचेवर परतुन घ्या.
मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला,टोमॅटो शिजत आला की मसुर घाला व नीट परतुन घ्या,नंतर लाल तिखट, कश्मिरी तिखट, गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली कोथींबीर घाला,मसुरच्या दुप्पट पाणी घालुन मसुर शिजायला ठेवुन द्या,उसळ चांगली शिजल्यावर एका बाउलमध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली कोथींबीर घालून झाकून ठेवा.

— श्री.प्रमोद लक्ष्मण तांबे उर्फ पामयाा
Leave a Reply