नवीन लेखन...

मनाचे श्लोक – १७१ ते १८०

असे सार साचार ते चोरलेसे | इही लोचनी पाहता दृश्य भासे |
निराभास निर्गूण ते आकळेना | अहंतागुणे कल्पिताही कळेना ||171||

स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या | स्फुरे ब्रध् रे जाण माया सुविद्या |
मुळी कल्पना दो रूपे तेचि जाली | विवेके तरी सस्वरूपी मिळाली ||172||

स्वरूपी उदेला अहंकार राहो | तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो |
दिशा पाहता ते निशा वाढताहे | विवेके विचारे विवंचूनि पाहे ||173||

जया चक्षुने लक्षिता लक्षवेना | भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना |
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो | दयादक्ष तो सक्षिने पक्ष घेतो ||174||

विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी | परी लीहिता कोण त्याचे कपाळी |
हरू जाळितो लोक संहारकाळी | परी शेवटी शंकरा कोण जाळी ||175||

जगी द्वादशादित्य ते रूद अकःा| असंख्यात संख्या करी कोण शकःा |
जगी देव धुंडाळिता आढळेना | जनी मख्य तो कोण कैसा कळेना ||176||

तुटेना फुटेना कदा देवराणा | चळेना ढळेना कदा दैन्यवाणा |
कळेना कळेंना कदा लोचनासी | वसेना दिसेना तो जनी मीपणाशी ||177||

जया मानला देव तो पूजिताहे | परा देव शोधूनि कोणी न पाहे |
जगी पाहता देव कोटयानकोटी | जया मानली भक्ती जे तेचि मोठी ||178||

तिन्ही लोक जेथून निर्माण जाले | तया देवरायासि कोणी न बोले |
जगी थोरला देव तो चोरलासे | सदगुरूवीण तो सर्वथाही न दीसे ||179||

गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी | बहूसाल मंत्रावळी शक्ति मोंठी |
मनी कामना चेटके घातमाता | जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ||180||

– श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..