आपण रोजच्या व्यवहारात हे मराठी शब्द नक्कीच वापरु शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे ?
१. मित्राच्या फोटोवर… nice/great/ wow ऐवजी मस्त/ छान/ भारी/ सुंदर/अप्रतिम अशा कमेन्ट करुन बघा…
२. एखाद्याला Happy bday… ऐवजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणून बघा… त्यातला आपलेपणा जरा जास्त असतो.
३. एखादयाने शुभेच्छा दिल्यावर Same to u नाही, तर धन्यवाद म्हणून बघा…
४. Online गप्पा मारताना सुरुवात नमस्कार या शब्दाने करुन पहा…
५. परत जाताना bye ऐवजी परत भेटू असं म्हणा… मग त्यातला आपलेपणा जाणवेल…
हे सगळं फक्त करुन पहा, कारण त्यानंतरच किंमत कळेल! आपल्या भाषेची… आपल्या माणसांची…
बघा जमतयं का ?
एक पाऊल मराठी भाषेकरीता..!
Leave a Reply