नवीन लेखन...

मानवी समस्या आणि स्थिरता

मानवी समस्यांना काही मर्यादाच नाही. मानवाच्या जन्मापासून ज्या समस्या सुरू होतात त्या त्याच्या मृत्यानंतरही त्याचा पाठलाग करीत राहतात. धन – संपत्ती आणि सत्ता हेच मानवी समस्यांवरील एक रामबाण औषध असल्याचे मानव स्वतःला अगदी अनादी काळापासून पटवून देत आलाय आणि देत आहे त्यामुळेच धन – संपत्ती आणि सत्ता मिळविण्याचा मोह त्याला सहजी टाळ्ता येत नाही. ज्यांना तो टाळ्ता येतो त्यांचा ‘बुध्द’ होतो. मोहच आज ही मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे. हा मोहामुळेच संपूर्ण मानवजाती विनाशाकडे वाटचाल करीत आहे. आपल्या गरजेपेक्षा जास्त मिळविण्यासाठी प्रत्येक माणूस धडपडत आहे. त्या धडपडीत आज माणूसच मानव जातीचा सर्वात मोठा शत्रू झालेला आहे. जगभरात नाते-संबंध नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, संस्कार क्षीण होत चाललेत, संस्कृती लयाला जाण्याच्या मार्गावर आहे. सर्वत्र त्यागाची जागा स्वार्थाने घेतलेली आहे. आजचा मानव मानसिक शांतीच्या शोधात वणवण करीत असला तरी ती त्याला जगात कोठेही सापडलेली नाही आणि आता सापडणार ही नाही. मोह, स्वार्थ, धन- संपत्ती आणि सत्ता यांपासून दूर राहणार्यांरना आजच्या जगात मुर्खात काढले जाते पण खरं तर ते किंचित का होईना मानसिक शांतीच्या जवळ-पास असतात. आज माणूस धन- संपत्ती आणि सत्तेसाठी इतका हापापलेला आहे की त्याला जवळ- जवळ सर्वच नात्यांचा विसर पडलेला आहे. आपण हे जग सोडून जाताना स्वतःसोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही हयाचा ही आजच्या मानवाला विसर पडलेला आहे. आपल्या पुढच्या पिढयांच भविष्य सुरक्षीत करण्यासाठी काही हजार लोक वर्तमानात लाखो लोकांच जगण असहय करण्याला कारणीभूत ठरत आहेत.

मी माझ्या गरजेपेक्षा अधिक धन-संपत्ती आणि सत्ता मिळविण्यासाठी का धडपडतोय ? हा प्रश्न आजचा मानव स्वतःला कधीच विचारत नाही त्यामुळे लाखो लोकांच्या अन्न वस्त्र आणि निवारा हया मुळभूत गरजा ही पूर्ण होत नाहीत. गरीब माणूस आपल्या दैवाला दोष देत आयुष्य काढत राहतो आणि त्यातील एखादा आपल्या स्वार्थाला खतपाणी घालून श्रीमंत होतो तेंव्हा तो गरीब आणि गरीबी तिरस्कार करू लागतो. खरं पाहता गरीबी – श्रीमंती अस काही अस्तित्वातच नसतं. गरीबी- श्रीमंती हया मानण्यात आहेत. आपण एखादयाला गरीब मानतो म्ह्णून तो गरीब असतो आणि एखादयाला श्रीमंत मानतो म्ह्णून तो श्रीमंत. मानवाने निर्जिव वस्तूंवरच नाही तर सजीव पशू-पक्षांवर मालकी हक्क गाजवायला सुरूवात केली तेंव्हा पासून त्याच्या हे मानण्याला सुरूवात झाली. मानवाने कोणावर ही मालकी हक्क न गाजविल्यास आणि कोणालाही आपल्यावर मालकी हक्क गाजवू न दिल्यास त्याच्या जीवनाला स्थिरता प्राप्त होते. एकदा का माणसाच्या जगण्याला स्थिरता प्राप्त झाली की त्याचा प्रवास मानसिक शांती मिळविण्याच्या दिशेने अव्याहतपणे सुरू होतो. पण आजच्या काळात ती स्थिरता मिळविणे जवळ- जवळ अशक्य आहे कारण कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवण, आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण आणि प्रलोभनांच्या आहरी न जाणं सोप्प नसतं. सर्वसामान्य माणसांना हे शक्य होत नाही कारण सर्वसामान्य माणसे आपल्या सोयीनुसार आपल्या पाप-पूण्याच्या व्याख्या बदलत असतात. जीवनातील नात्यांच महत्व आणि त्यांच्या परिभाषा आपल्या सोयीनुसार बदलत असतात. काही लोक आपला स्वार्थ साधन्यासाठी आपल्या विचारांना, संस्कारांना आणि प्रसंगी संस्कृतीला ही धाब्यावर बसवितात. जीवनात स्थिर असणं आणि स्थिर असल्याच ढोंग करण यात बरच अंतर आहे. जीवनात स्थिर असणार्यानला वाटत असत शिवाजी आपल्या घरी जन्माला यावा आणि जीवनात स्थिर असल्याच ढोंग करणार्यानला वाटत असत शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा. जीवनात स्थिरता प्राप्त केलेल्या मानवाला मानवी समस्यांचा त्रासच होत नाही कारण तो त्रास होण्याच्या पलिकडे गेलेला असतो आणि मुळात मानवी समस्यांचा जन्मच जीवनातील अस्थिरतेतून झालेला असतो…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..