नवीन लेखन...

यष्टीवेधी बर्टी आणि सच्चूचे पहिले शतक





यष्ट्या एका क्षणी उडवून फलंदाजाला परतीची वाट दाखविणार्‍या माणसाला यष्टी‘रक्षक’ का म्हणत असावेत ? कसोटी इतिहासातील यष्टीमागील बळींचे शतक पूर्ण करणार्‍या पहिल्या व्यक्तीचा जन्म ९ सप्टेंबर १८९४ रोजी झाला. त्याने बूट खुंटीला टांगून ठेवले तेव्हा त्याच्या ग्लोव्ह्जवर १३० बाद-खुणा उमटलेल्या होत्या आणि त्यापैकी केवळ अठ्ठ्याहत्तर खुणा झेलांच्या होत्या. तब्बल ५२ फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या बर्ट ओल्डफील्डने यष्टीचित केले होते. आजही हा विश्वविक्रम आहे! शरीरवेधी गोलंदाजीमुळे गाजलेल्या १९३२-३३ च्या अ‍ॅशेस मालिकेत हॅरॉल्ड लारवूडच्या एका उसळ्या चेंडूने जखमी होण्याआधी बर्टीने ४१ धावा काढल्या होत्या. एकूण चार अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.

इतकी सगळी एकदिवसीय शतके रचणार्‍या फलंदाजाला पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकासाठी किती सामने वाट पाहावी लागली असेल म्हणता ? उत्तर आहे सातावर सात ! आपल्या कारकिर्दीतील अठ्ठ्याहत्तराच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या सचिन तेंडुलकरने कोलंबोतील रणिलसिंघे प्रेमदासा मैदानावर (त्यावेळी हे मैदान ‘खेत्तरमा मैदान’ म्हणून ओळखले जाई) ९ सप्टेंबर १९९४ रोजी ४३ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले आणि ह्या पन्नाशीला आणखी एका पन्नाशीची जोड देण्यात तो यशस्वी झाला. सामना होता सिंगर विश्व मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध. हा सामना भारताने ३१ धावांनी जिंकला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..