नवीन लेखन...

शुभ दिपावली

मराठीसृष्टीच्या सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिपावलीनिमित्त मराठीसृष्टीने नवीन रुप धारण केलेले आपण बघितलेच आहे. मराठी भाषेसाठीच्या तंत्रज्ञानात नित्यनवे बदल करणे आणि नवेनवे प्रयोग करणे हे मराठीसृष्टीचे एक खास वैशिष्ट्य आहेच. त्यामुळे या पोर्टलवर आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन अनुभवायला मिळते.

मराठीमध्ये खरंतर मोठी पोर्टल्स अतिशय मोजकीच आहेत. वृत्तपत्रांच्या म्हणून ज्या वेबसाईटस आहेत त्यांना भले वाचकवर्ग बराच मोठा मिळत असेल, पण त्यांची खरी ओळख केवळ त्या त्या वृत्तपत्राची इंटरनेटवरची आवृत्ती – जी सामान्यपणे त्या वृत्तपत्रातील बातम्या कॉपी करुन बनवलेली असते – अशीच आहे. त्यामुळे अशा वृत्तपत्रांच्या वेबसाईटसना काही वेगळा चेहेरा नसतो.

मराठीसृष्टीने मात्र आपलं वेगळेपण सुरुवातीपासून जपलंय. वाचकांना एक वेगळा अनुभव देणं हे यामागचं सूत्र आहेच, पण आता आम्ही आमच्या वाचकांना आणखीही काहीतरी देतोय. मराठी भाषेत जास्तीत जासगत मजकूर इंटरनेटवर उपलब्ध करण्याच्या मराठीसृष्टीच्या या प्रयत्नात आता आमच्या वाचकांना आम्ही मोठ्या संख्येने सामावून घेतोय. आमच्या वाचकांसाठी मराठीसृष्टीवर लिहिण्याची सोय तर पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. मात्र या सोयीचा फायदा घेणार्‍या वाचकांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घालण्यासाठी एक योजना आम्ही बनविली आहे आणि पुढच्या एक-दोन दिवसात ती अमलातही येत आहे. या योजनेची माहिती सोमवारी, म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी आमच्या सर्व वाचक आणि लेखकांना इ-मेलद्वारे पाठवली जाईल आणि ती येथेही प्रदर्शित केली जाईल.

मराठी भाषेत अक्षरश: लक्षावधी पानांचा मजकूर तयार करुन तो इंटरनेटवर आणून मराठी भाषेला इंटरनेटवर समृद्ध करणे या उद्देशाने झपाटलेल्या मराठीसृष्टीच्या टीमकडून आपणा सर्वांना दिपावलीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा !!!!!

— निनाद अरविंद प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..