नवीन लेखन...

सागरा, प्राण तळमळला



ने मजसि ने परत मातृभूमिला । सागरा, प्राण तळमळलाभूमातेच्या चरणतला तुज धूंता । मी नित्य पाहिला होतामज वदलासी अन्य देशी चल जाऊ । सृष्टीची विविधता पाहूतई जननी-हृद् विरहशंकितहि झाले । परि तुवां वचन तिज दिधलेंमार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठि वाहिन । त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे बनुनी । मी तव अधिक शक्त उद्धरणीं । मी येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला ।।१।।शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशीभूविरह कसा सतत साहू यापुढती । दशदिश तमोमय होतीगुण-सुमनें मी वेचियली या भावे । की तिने सुगंधा घ्यावेजरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे तो बाल गुलाबही आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला ।।२।।नभिं नक्षत्रे बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा ताराप्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारीतिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिचा भुलविणें व्यर्थ हें आता । रे बहु जिवलग गमतें चित्ता । रे &nbsp
; तुज सरित्पेते । जी सरिता । रे तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला ।।३।।या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा ?त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवते । भिऊन का आंग्लभूमीतें ?मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी तरि आंग्लभूमि-भयभीता । रे अबला न माझिही माता । रे कथिल हें अगस्तिस आता । रे जो आचमनी एक

पलीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला ।।४।।

— स्वातंत्र्यवीर सावरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..