नवीन लेखन...

ऑक्टोबर १५ गोलंदाज गूच आणि वकार-वसिम शो

१५ ऑक्टोबर १९८९ रोजी दिल्लीत नेहरू चषकाचा सामना श्रीलंका आणि इंग्लंडदरम्यान झाला. अलेक स्टेवर्ट आणि अँगस फ्रेजर यांनी आपापली पदार्पणे साजरी केली. ग्रॅहम गूचने अनपेक्षितरीत्या या सामन्यात गोलंदाजीत यश मिळविले. इंग्लंडचा कर्णधार म्हणून दुसराच सामन खेळताना त्याने स्वतःलाच पूर्ण दहा षटकांची गोलंदाजी दिली आणि अवघ्या २६ धावा मोजत २ बळी मिळविले. १९७९-८० च्या हंगामात शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला वेन लार्किन्स या सामन्यात पुन्हा खेळला- नऊ वर्षे आणि २६७ दिवसांनंतर. एदिसांच्या इतिहासातील हा विक्रम आहे.एक, एक से भले दो की एक, एक से बुरे दो म्हणावे अशी द्विधा उत्पन्न करणार्‍या एका वेगवान जोडगोळीच्या करामतीचा तडाखा उपरोल्लेखित घटनेनंतर बरोब्बर एक वर्षाने कराचीत बसला; पाहुण्या किवी फलंदाजांना. वकार युनिस आणि वसिम अक्रम यापूर्वीही कसोट्यांमध्ये एकत्र खेळले होते पण दोघांमध्ये मिळून दहा बळी त्यांनी यापूर्वी कधी मिळविले नव्हते. पाकिस्तानने या सामन्यात एक डाव आणि ४३ धावांनी विजय मिळविला. त्यांनी सामन्यात मिळून एकूण १५ गडी बाद केले; त्यापैकी ११ बळी पायचित-त्रिफळाचित होते. १९९० ते १९९४ या चार वर्षांच्या कालावधीत २४ कसोट्यांमध्ये वकार-वसिम एकत्र खेळले आणि त्यांपैकी तब्बल ३/४ सामन्यांमध्ये त्यांनी मिळून प्रतिस्पर्ध्यांचे दहा गडी बाद केले. जुन्या चेंडूचा वापर करून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणारी वकार-वसिम ही सर्वात मारक जोडगोळी मानली जाते.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..