१५ ऑक्टोबर १९८९ रोजी दिल्लीत नेहरू चषकाचा सामना श्रीलंका आणि इंग्लंडदरम्यान झाला. अलेक स्टेवर्ट आणि अँगस फ्रेजर यांनी आपापली पदार्पणे साजरी केली. ग्रॅहम गूचने अनपेक्षितरीत्या या सामन्यात गोलंदाजीत यश मिळविले. इंग्लंडचा कर्णधार म्हणून दुसराच सामन खेळताना त्याने स्वतःलाच पूर्ण दहा षटकांची गोलंदाजी दिली आणि अवघ्या २६ धावा मोजत २ बळी मिळविले. १९७९-८० च्या हंगामात शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला वेन लार्किन्स या सामन्यात पुन्हा खेळला- नऊ वर्षे आणि २६७ दिवसांनंतर. एदिसांच्या इतिहासातील हा विक्रम आहे.एक, एक से भले दो की एक, एक से बुरे दो म्हणावे अशी द्विधा उत्पन्न करणार्या एका वेगवान जोडगोळीच्या करामतीचा तडाखा उपरोल्लेखित घटनेनंतर बरोब्बर एक वर्षाने कराचीत बसला; पाहुण्या किवी फलंदाजांना. वकार युनिस आणि वसिम अक्रम यापूर्वीही कसोट्यांमध्ये एकत्र खेळले होते पण दोघांमध्ये मिळून दहा बळी त्यांनी यापूर्वी कधी मिळविले नव्हते. पाकिस्तानने या सामन्यात एक डाव आणि ४३ धावांनी विजय मिळविला. त्यांनी सामन्यात मिळून एकूण १५ गडी बाद केले; त्यापैकी ११ बळी पायचित-त्रिफळाचित होते. १९९० ते १९९४ या चार वर्षांच्या कालावधीत २४ कसोट्यांमध्ये वकार-वसिम एकत्र खेळले आणि त्यांपैकी तब्बल ३/४ सामन्यांमध्ये त्यांनी मिळून प्रतिस्पर्ध्यांचे दहा गडी बाद केले. जुन्या चेंडूचा वापर करून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणारी वकार-वसिम ही सर्वात मारक जोडगोळी मानली जाते.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply