नवीन लेखन...

ऑक्टोबर १८ झिम्मींची पहिली कसोटी आणि आरंभशूर नरेंद्र

१९६८ : दणदणीत पदार्पण, खणखणीत पुनरागमन आणि चटपटीत अपयश अशा विचित्र रंगांची कारकीर्द लाभलेल्या नरेंद्र दीपचंद हिरवानीचा जन्म. स्थळ गोरखपूर, उत्तर प्रदेश. त्याच्याइतके झक्कास पदार्पण लाभायला भाग्यच हवे. १९८७-८८ च्या मोसमात मद्रासमध्ये विंडीजविरुद्ध १३६ धावा देऊन १६ गडी बाद करीत हिरवानीने मोठ्ठा आवाज केला. दुसर्‍या डावातील त्याच्या ८ बळींमध्ये किरण मोरेच्या पाच यष्टीचितांचा समावेश होता. विज्डेनच्या संवाददात्याच्या म्हणण्यानुसार “याच्यावर जोर द्यायलाच हवा की त्याला अत्यंत निकृष्ट दर्जाच्या खेळपट्टीची साथ लाभली.” यशस्वी कारकीर्द आणि यशस्वी पदार्पण यांचा संबंध काही वेगळाच असावा. पहिल्या चार कसोट्यांमधून ३६ गडी बाद करणारा हिरवानी पुढे ९ सामन्यांमधून केवळ २१ गडीच बाद करू शकला. २३ वर्षांहून अधिक काळ तो प्रथमश्रेणी सामने खेळला.

१९९२ : झिंबाब्वेने हरारेत भारताविरुद्ध खेळून कसोटीपदार्पण केले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच सामन्यात झिम्मींनी पराभव स्वीकारला नाही. पहिल्या डावात २१५ षटके खेळत त्यांनी ४२६ धावा केल्या- कधी कसोटी खेळायला न मिळाल्यासारखे ते खेळत होते !! बरोब्बर १०० धावांची सलामी केविन अर्‌नॉट आणि ग्रँट फ्लॉवराने दिली. डेव हॉटन या झिम्मी कर्णधाराने पदार्पणातच शतक ठोकले. मात्र त्याच्याआधी ग्रँट फ्लॉवरने अर्धशतक पुरे केले होते. हॉटननंतर अँडी फ्लॉवरनेही अर्धशतक पूर्ण केले. हेही खरेतर समजण्यासारखे होते पण भारतीयांची बारी आली तेव्हा भारतीयांनी १७० षटकांमध्ये केवळ ३०७ धावाच काढल्या. संजय मांजरेकर आठ तासांहून अधिक काळ खेळत शतक पूर्ण केले. २२ वर्षे आणि २२२ दिवसांनंतर जॉन ट्राईकोस ‘पुन्हा’ कसोटी खेळला. पूर्वी तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळला होता. पंचेचाळीस वर्षांच्या ट्राईकोसने १९ वर्षांच्या सचिन तेंडुलकरला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत तिसर्‍याच चेंडूवर बाद केले. त्या तिन्ही चेंडूंवर सचिनला धाव काढता आली नव्हती. झिम्मींनी पदार्पणातच मास्टर ब्लास्टरला शून्यावर परतविले. भारताला दुसरा डाव आलाच नाही!

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..