नवीन लेखन...

ऑक्टोबर २६ – बकरा केन आणि कैदी हॅरी

बकरा केन – १९६५ : न्यूझीलंडच्या केन रुदरफोर्डचा जन्म. केनच्या कसोटी कारकिर्दीची सुरवात वाईट झाली. कॅरिबिअन बेटांवरील १९८४-८५ च्या पहिल्याच मालिकेत त्याने सात डावांमध्ये मिळून बाराच धावा काढल्या. पदार्पणाच्या कसोटीत दुसर्‍या डावात एकाही चेंडूचा सामना न करता धावबाद होत त्याने ‘चष्मा’ पटकावला. दोन्ही डावांमध्ये शून्यावर बाद होणार्‍या फलंदाजाची सामन्यातील कामगिरी ०० अशी येते. हे चष्म्यासारखे दिसते म्हणून त्याला ‘पेअर’ म्हणण्याचा प्रघात आहे. एकाही चेंडूचा सामना न करता बाद होण्याचा पराक्रम ‘डायमंड डक’ = हिरेबदक म्हणून ओळखला जातो. पहिल्याच चेंडूवर बाद होणे म्हणजे सुवर्ण‘ब’दक, दुसर्‍यावर बाद झाल्यास रजत’ब’दक आणि तिसर्‍यावर झाल्यास कांस्य’ब’दक. माल्कम मार्शलने पाच वेळा बाद करीत रुदरफोर्डला आपले गिर्‍हाईक बनविले. नंतर मात्र तो या भयावह सुरुवातीतून सावरला. कसोटीत त्याची सरासरी २७ एवढी राहिली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षीच दुर्दैवाने त्याची कसोटी कारकीर्द संपली.

कैदी हॅरी – १८९० : पहिल्या महायुद्धादरम्यान कैदी म्हणून पकडल्या गेलेल्या एकमेव कसोटीवीराचा जन्म. हॅरी ली याला जर्मनांनी पकडल्यानंतर तो मृत्यू पावल्याचे (चुकीचे) वृत्त प्रसिद्ध झाले. मांडीला जबरदस्त दुखापत झाल्याने तो पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही असे सांगितले गेले. हा आडाखाही चुकीचा ठरला. काहीसा लंगडत असूनही लीने मिडलसेक्ससाठी वीस हजारावर धावा काढल्या आणि चारशेहून अधिक बळीही घेतले. १९३०-३१ मध्ये पर्सी चॅपमनच्या संघाला दुखापतींनी घेरल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका कसोटीत त्याला संधी मिळाली. वयाच्या शतकाला नऊ कमी असताना लंडनमध्ये तो मृत्यू पावला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..