नवीन लेखन...

ऑक्टोबर २७ – ‘गुणी’ टेलर आणि मुरलीचा दणका

‘गुणी’ टेलर १९६४ : कसोटी सामन्यांना प्रेक्षणीय, लोकप्रिय आणि निकाली बनविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या एका धुरंधर कर्णधाराचा जन्म. मार्क टेलरने अलन बॉर्डरकडून कप्तानी मिळताच पंधरा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने विंडीजचा पराभव करून फ्रँक वॉरेल चषक जिंकला. प्रमुख गोलंदाजांना गडी बाद होत नसल्याचे दिसताच तो ब्लिवेट, पॉन्टिंग वगैरेंकडे चेंडू सोपवी आणि ते झटकन बळीही मिळवीत. त्याला अनिर्णिणता आवडत नसे. त्याच्या नेतृत्वाखालील ५० सामन्यांपैकी अकराच अनिर्णित राहिले. ‘ढोल्या’ टेलरने प्रेक्षणीयता वाढविली कशी याचा हा ठळक पुरावा आहे. सलामीवीर म्हणून त्याला संघर्ष करावा लागला. १९९५ ते १९९७ दरम्यानच्या काळात २१ डावांमध्ये तो पन्नाशी गाठू शकला नाही. ४३.४९ ही त्याची अंतिम सरासरी मात्र फलंदाज म्हणून त्याच्या श्रेष्ठतेची साक्ष देते.

मुरलीचा दणका २००० : ३० धावांमध्ये ७ बळी. त्यावेळची एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोत्तम कामगिरी. चेंडूबहाद्दर होता मुथय्या मुरलीदरन आणि प्रतिस्पर्धी (अर्थातच) भारत ! मर्वन अटापट्टू आणि महेला जयवर्धने यांच्या शतकांच्या जोरावर लंकेने ५ बाद २९४ धावा उभारल्या. भारत २ बाद ९९ पर्यंत पोहचलेला असताना मुरली गोलंदाजीस आला आणि केवळ ५० चेंडूंमध्ये अवघ्या २३ धावा मोजत त्याने ७ गडी टिपले. दोनच दिवसांनंतर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय त्याला तुलनेने बरे सामोरे गेले (६ धावात ३ बळी) पण सुमारे अडीचशे धावांनी भारताने…..दो दिन का इंतजार !

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..