नवीन लेखन...

ऑक्टोबर ३१ – पहिला नायक आणि पहिला त्रिक्रम व सुनीलचे नवल

पहिला नायक

१८९५ : भारताच्या पहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म. कर्नल कोट्टरी कंकरिया नायडू ड्राईव्ह करण्यात अतिशय पटाईत फलंदाज आणि उपयुक्त मंदगती गोलंदाज होते. भारताने कसोटीचा उंबरठा ओलांडला तेव्हा त्यांचे वय ३६ होते. ते सातच कसोट्या खेळू शकले. त्यांची सर्वोत्तम खेळी त्यांच्या अखेरच्या सामन्यात झाली. ओवलवर १९३६ मध्ये गबी अलनच्या एका चेंडूमुळे सौरगुच्छिकांना (उदराच्या वरच्या भागातील चेतापेशींचा समूह, याला झालेली इजा फार वेदनादायी असते) जोरदार मार लागलेला असूनही ‘जखमी निवृत्त’ होण्यास त्यांनी नकार दिला आणि संयमी ८१ धावा काढीत डावाचा पराभव वाचविला. १९१६ पासून १९६३ पर्यंत (वयाचे ६८वे वर्ष) सहा दशके ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. इंदौरमध्ये १९६७ साली त्यांचे निधन झाले.

पहिला त्रिक्रम आणि नवलाचे शतक

१९८७ : विश्वचषक स्पर्धेतील पहिला त्रिक्रम. आपल्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर केन रुदरफोर्ड, इअन स्मिथ आणि इवेन चॅटफिल्डला बाद करीत भारताच्या चेतन शर्माने त्रिक्रम साधला. भारताने या त्रिक्रमाच्या बळावर नागपुरात न्यूझीलंडचा नऊ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाहून सरस गुण मिळवीत उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला २२२ धावांचे उद्दिष्ट ४२.२ षटकांमध्ये गाठणे आवश्यक होते. भारताने हे ३२.१ षटकांमध्येच गाठले. याला कारणीभूत होती विज्डेनच्या म्हणण्यानुसार ’श्वास रोखून धरायला लावणार्‍या योग्यतेची फलंदाजी’. कृष्णम्माचारी श्रीकांतने ५८ चेंडूंमध्ये ७५ धावा काढल्या पण दिवसाखेर नवलाची गोष्ट वेगळीच राहिली. नवलकथा अशी की, एका फलंदाजाचे धावा काढण्याच्या बाबतीत श्रीकांतशी टक्कर घेत ८५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. १०८ एकदिवसीय सामने खेळलेल्या सुनील गावसकरचे हे एकुलते एक शतक !

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..