नवीन लेखन...

आभाळाएवढा !

त्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

आणि तो एकदम मोठा होऊन गेला.
मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा.
आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा.
अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती.
अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती.

तो सातत्यानं लिहीत होता.
कथा, कादंबरी, कविता, नाटकं, संगीत नाटकं, एकांकिका, श्रुतिका, प्रवासवर्णने, वैचारिक लेखन, ललित लेखन, समीक्षा. ..
साहित्याच्या अनेक प्रांतात तो गेली अनेक वर्षे लीलया वावरत होता.

त्यानं लिहावं आणि चर्चेत राहावं — हे नित्याचंच.
लेखनासाठी नवे मापदंड निर्माण करायला लागावेत — हे नित्याचंच.
बदलत्या तरुणाईला त्यांची अशी नवी भाषा द्यावी — हे नित्याचंच.
फॅशन, भाषा, कथाबिजातील नाविन्य — हे नित्याचंच.
केंद्र शासनाचे, राज्यशासनाचे प्रतिष्ठित पुरस्कार — हे ही नित्याचेच. ..
तेही वशिला न लावता, सेटिंग न करता, ‘ होयबा ‘ वृत्ती न ठेवता मिळालेले.

केवळ गुणवत्ता, आशयघनता,
अनुभवसंपन्नता, समृद्ध, प्रभावी भाषा, स्वतःची अशी खास विकसित केलेली शैली. ..

विकृतीचं नाव नाही.
देशहिताला तिलांजली नाही.
विघातकतेपेक्षा विधायक प्रवृत्तीला प्राधान्य.
अवघड, अनवट वाटांचा शोध घेणारी मूलगामी, दुर्मिळ प्रतिभाशक्ती.

सारं काही होतं…
समाजमान्यता, शासनमान्यता, रसिकमान्यता. ..

पण ते तेव्हढं मानाचं मानलं जाणारं आणि ज्यासाठी साहित्यिक आपला जीव टाकतात ते साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळत नव्हतं.
तसंही त्याला मनापासून ते नकोच होतं.
पण रसिकांचा आग्रह होता.
पण त्यासाठी असणाऱ्या निवडणुकांच्या निकषात तो बसत नव्हता.
आणि काही सन्मान्य अपवाद सोडले तर संमेलनाध्यक्षपद मिळविण्यासाठी लागणारी वेगळी प्रवृत्ती त्याच्याजवळ नव्हती.
संमेलनाध्यक्ष पद मिळविण्यासाठी करावी लागणारी लाचारी, हांजीहांजी, राजकीय पक्षांचा लपून छपून घेतलेला आडोसा, लेखणीला बटीक बनवून कुणाच्याही शेजेवर पाठवून देण्याची भडवेगिरी, मुर्दाड, बिनकण्याची, लाळघोटी स्वार्थीवृत्ती, त्याच्याजवळ नव्हती.
ज्या गावाला जायचं नाही त्या गावाला जायची वाट त्यानं केव्हातरी बंद करून ठेवली होती. कारण रसिकांच्या हृदयातील अढळ स्थान हाच परमोच्च पुरस्कार मानला होता त्यानं. तेच महत्वाचं पद होतं त्याच्या दृष्टीनं.

पण रसिक काही स्वस्थ बसलेले नव्हते.
त्यांनी त्याला बिनविरोध निवडून आणायचा चंगच बांधला.
— आणि तो बिनविरोध निवडून आलासुद्धा.

त्याचक्षणी ठिणगी पडली.
हा बिनविरोध निवडून येतोच कसा ?
आमच्या विचारधारेच्या विरोधात तो ठामपणानं उभा आहे, मग त्याला हक्क कसा पोहोचतो हे पद स्वीकारण्याचा ?
वर्तमानकालीन सत्ताधीशांचा निषेध म्हणून अजून त्यानं एकही पुरस्कार परत केलेला नाही.
पुरस्कार वापसी गँग मध्ये तो सामील नाही.
या देशात राहावं असं वाटत नाही, असं, तो म्हणत नाही.
भारतातल्या असहिष्णू हवेमुळे आपल्या कुटुंबियांना धोका आहे असं तो म्हणत नाही.
सगळे मानमरातब, कर चुकवून घेतलेलं प्रचंड मानधन, अनेक पुरस्कार स्वीकारून, जीवनगौरव स्वीकारून, विद्यापीठात, बोर्डात वशिला लावून स्वतःची पुस्तकं खपवून, ‘ सरकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतेय ‘ असं क्रांतिकारी आणि दिशादर्शक रडगाणं तो माध्यमांसमोर गात नाही.
देशद्रोही, शत्रूधार्जिण्या विचारांना तो प्रागतिक मानत नाही.
भारत तेरे टुकडे होंगे हजार असं म्हणणाऱ्यांना, आपल्या छाताडावर नाचविण्यासाठी कुणाचीही हुंगेगिरी तो करीत नाही किंवा ढुंगणही चाटत नाही.
माझ्या हाती पिस्तूल आलं तर मी या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा गोळी घालेन असं म्हणत नाही आणि असं म्हटल्यानंतर क्रांतीची पहाट झाली असंही तो म्हणत नाही.
समाजात सर्व प्रकारचे भेदभाव निर्माण व्हावेत असाही प्रयत्न तो आपल्या लेखनातून, व्याख्यानातून, भाषणातून करीत नाही.
असे प्रयत्न करणाऱ्यांना तो जवळ करीत नाही.
हा कंपुशाही निर्माण करीत नाही.
हा वाचाळ नाही.
हा प्रसिद्धीसाठी सवंगपणा करीत नाही.
हा प्रसिद्धीसाठी मीडियाला हाताशी धरून स्वतःवर दिवे ओवाळून घेत नाही.
हा कसला लेखक ?
हा कसला संमेलनाध्यक्ष ?

भयंकर गदारोळ. ..
वैचारिक संभ्रम. ..
लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारची नाहक बदनामी. ..
जणू सगळे राष्ट्रीय प्रश्न संपले, आता केवळ, ‘ हा संमेलनाध्यक्ष कसा झाला ‘ या राष्ट्रीय प्रश्नावर मीडियाचा वांझोटा, निरर्थक काथ्याकूट…

त्याला कळेना हे काय चाललंय.
तो उद्विग्न झाला.
आणि त्याच उद्विग्नतेपायी त्यानं संमेलनाध्यक्ष पद सोडलं.

पण रसिक सावध होते.
असं काही घडू शकेल याची बहुधा त्यांना जाणीव होती.
त्यांनी त्याच शहरात, अन्यत्र, समांतर साहित्य संमेलन सुरु केलं आणि त्यांच्या लाडक्या लेखकाला सन्मानानं संमेलनाध्यक्ष पदावर विराजमान केलं.

आणि इकडे तथाकथित बुद्धिजीवी साहित्यिक, हे काय घडलं, म्हणून गोंधळात पडले. विचारात हरवले.
चीन, रशिया, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल अशा ठिकाणी आशाळभूत पणे डोळे लावून बघू लागले.

आणि कुंपणावर बसलेले, छटाकभर प्रतिभाशक्तीचे, परोपजीवी, परावलंबी साहित्यिक पटापटा, समांतर साहित्य संमेलनाच्या दिशेनं पळू लागले.
रसिकांचं अन्यत्र लक्षच नव्हतं.
संमेलनाध्यक्ष काय विचार देतात, त्याकडे त्यांचं लक्ष होतं.

लेखक त्यामुळं अधिकच मोठा झाला होता.
आभाळाएवढा मोठ्ठा. ..!!

— डॉ. श्रीकृष्ण जोशी 
रत्नागिरी 
9423875806

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..