नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्म १५ जून १९३७ भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. […]

जागतिक वारा दिवस – १५ जून

खारे वारे, मतलई वारे, व्यापारी वारे हे सर्व वारे आपण भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतील रिकाम्या जागा भरण्यापुरतेच राहिल्याने हवा का बदलते याची उत्तरे अनुत्तरित राहतात. […]

मल्लखांब दिन – १५ जून

मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती. […]

जागतीक रक्तदान दिवस

यंदा जागतिक रक्तदान दिवसाची थीम ‘सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते’ (Safe Blood Saves Lives) असून. ‘रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा’ (Give Blood And Make The World a Healthier place) हे या वर्षीचं स्लोगन आहे. […]

सोशल मिडियावरील आनंदाची सहा वर्षे

काही काळानी मी आरोग्याच्या विषयी व संगीत व चित्रपट या विषयी समूह चालू केले. संगीत व चित्रपट या विषयी लिखाण करत असताना एक कल्पना सुचली आपण रोज कॅलेंडर नुसार त्या त्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी, जन्मदिनी, स्मृतिदिनी त्यांची माहिती टाकावी, या कल्पनेला खूपच प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाने अनेक कलाकारांनी खूप छान प्रतिसाद दिला. […]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

आपल्या वक्तृत्वानच्या जोरावर लाखो चाहत्यां मध्ये लोकप्रिय असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भाषणामुळे नेहमी चर्चेत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा या भोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. […]

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे थोरले चिरंजीव. ते युवासेनेचे प्रमुख या नात्याने युवक संघटना सांभाळत आहेत. राज ठाकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आदित्य यांना युवकांची संघटना करण्यासाठी पुढे आणण्यात आले. […]

हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचा स्मृतिदिन

ग्रेगरी पेक हे हॉलिवुड मधले स्टाइल आयकॉन होते. १९४० ते १९६० पर्यतचं दशक ग्रेगरी पेक यांनी गाजवला. ‘मॅकेनाज् गोल्ड’च्या मुळे युवा पिढीमध्ये ते लोकप्रिय झाले. […]

जागतिक बाल कामगार विरोधी दिन – १२ जून

आंतरराष्ट्रीय श्रम संगठन (आयएलओ)नुसार जगभरात २१ कोटीपेक्षा जास्त मुलांकडून बालमजुरी करून घेतल्या जाते. संपूर्ण जगातून ७१पेक्षा जास्त देशांत बालमजूरी होते. विकासशील देशांत बालमजूरीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास भारतात बालकामगारांची संख्या खूप अधिक आहे. […]

पुण्यातील भारत सेवक समाजाचा वर्धापन दिन – १२ जून

गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले. […]

1 200 201 202 203 204 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..