अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्म १५ जून १९३७ भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. […]