नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

जेष्ठ गायिका माणिक वर्मा

अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा —क्षणभर उघड नयन देवा —तुझा नि माझा एक पणा —निघाले आज तिकडच्या घरी–झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. माणिक वर्मा यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी पुण्यात झाला. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, […]

आजचा विषय लाल तिखट

दैनंदिन आहारात लाल मिरचीचा समावेश अनिवार्य असतो. जेवण झणझणीत व चवीचे व्हायचे असेल, तर लाल तिखटाला पर्याय नाही. लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. देशातील ८० टक्के लोक आजही बाजारपेठेतील मनासारखी आवडणारी लाल मिरची विकत घेऊन ती कांडून वापरणेच पसंत करतात. शरीराची सुस्ती घालवण्यासाठी, तसेच शरीर तरतरीत ठेवण्यासाठी व निद्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी आहारात लाल मिरचीचा […]

बौद्ध पोर्णिमा

जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱया तथागत गौतम बुद्धांची ‘वैशाख बुद्ध पौर्णिमा’ जगभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे. याच पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या; त्या म्हणजे १. राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म, २. राजकन्या यशोधरेचा जन्म, ३. राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिणय (विवाह), ४. ज्ञानप्राप्ती, ५. महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत ‘वेसाक्को’ म्हणतात. वर उल्लेखिलेल्या […]

शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक निनाद बेडेकर

छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुणे येथे झाला. निनाद बेडेकर यांनी मॉडर्न शाळेतील शिक्षणानंतर शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या मातोश्री या सरदार रास्ते घराण्यातील होत्या. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महिलांचे संघटन केले होते. हाच वारसा निनाद बेडेकर यांच्याकडे आला. […]

जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल

फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म १२ मे १८२० रोजी इटली येथे झाला. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मृती सदैव तेवत राहाव्या म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी सेवाभाव, समर्पण आणि प्रेम यांचे प्रतीक असलेल्या आणि आरोग्य सेवा क्षेत्रात कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला होता. हा दिवस जगभर जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. परिचारिका […]

जागतिक कुटुंब दिन

१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. आजच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धतीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेकदा मुलांची त्यातून फरफट होते. मुळातच पाळणा घरापासून आयुष्याची सुरुवात करणाऱया मुलांना घरच्या संस्काराची उणीव भासतेच. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या संकल्पनेचे अनुकरण केल्याने नवीन पिढीला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणे अवघड झाले […]

बंगाली गायक सुबीर सेन

हेमंतकुमारसारखा आवाज असलेल्या सुबीर सेन यांना हिंदी चित्रपटांमध्ये फार थोडी गाणी मिळाली आणि तीही शंकर जयकिशन यांच्या मुळे. १९५०च्या काळात हेमंतकुमार फार लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १५ मे १९३२ रोजी झाला. त्यामुळे तशाच आवाजाच्या सुबीर सेन यांना शंकर जयकिशन यांनी ‘आस का पंछी’ चित्रपटात संधी दिली. नायक राजेंद्रकुमार व एनसीसी कॅडेटनी सायकलवरून म्हटलेले सुबीर सेन यांचे गाणे ‘दिल मेरा […]

धक धक गर्ल माधुरी दीक्षित

‘सुंदरता’, ‘नृत्य’ आणि ‘अभिनय’ यांचा सुरेख त्रिवेणी मिलाफ म्हणजे माधुरी दीक्षित. तिचा जन्म १५ मे १९६७ रोजी झाला. पूर्वाश्रमीची माधुरी शंकर दीक्षित आणि आजच्या माधुरी श्रीराम नेने. माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा […]

जेष्ठ निरुपणकार दत्तात्रय नारायण धर्माधिकारी

अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव ‘शेंडे’असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे […]

फेसबुक चा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्गचे वडिल इलियट हे व्यवसायाने डेन्टिस्ट तर आई मानसपोचारतज्ञ आहेत. त्याचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासुनच मार्कला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये रस निर्माण झाला होता. मुलाची कॉम्प्युटर मधली आवड बघुन मार्कच्या वडिलांनी त्याच्यासाठी खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. लहानपणी केवळ मजा म्हणुन मार्कने अनेक कॉम्प्युटर गेम्स तयार केले होते. लहान वयातच त्याने अटारी बेसिक वापरायला सुरवात […]

1 343 344 345 346 347 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..