नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत मेहेंदळे

१९७२ पासून चंद्रकांत मेहेंदळे यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. गॉसिप ग्रुप या विजय बोंद्रे यांच्या संस्थेशी ते जोडले गेले. या संस्थेच्या अनेक नाटकांसाठी त्यांनी काम केले. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यानंतर ते विनय आपटे यांच्यासोबत त्यांच्या गणरंग या संस्थेत कार्यरत होते. विनय आपटे आणि त्यांची मैत्री होती. चंद्रकांत मेहेंदळे यांनी अरूण साधू यांच्या कादंबरीवर आधारित बहिष्कृत नाटक लिहिले. हे नाटक त्यावेळी लोकप्रिय झाले. […]

‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. ‘सैराट’चित्रपटाने ‘दणदणीत १०० कोटींचा गल्ला जमवला होता. सैराटला अजय-अतुल यांचे संगीत होते. नागराज मंजूळे यांची उत्कृष्ट पटकथा व लेखक होते. ‘सैराट’ चित्रपटाची जादू पाहून बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता. […]

ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के

अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटामधील खलनायकी भूमिकेमुळे शिर्कें यांच्या कारकीर्दीला गती मिळाली. ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘घनचक्कर’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘शेम टू शेम’, ‘अबोली’, ‘रात्र आरंभ’, ‘मराठा बटालियन’, ‘व्हेंटिलेटर’ हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट. ‘तिरंगा’, ‘वंश’, ‘जुडवा’, ‘खुदा गवाह’, ‘जय किशन’, ‘जीत’, ‘काला साम्राज्य’, ‘इश्क’, ‘भाई’, ‘टारझन द वंडर कार’ हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट. […]

लेखिका,गायिका, नाट्यअभिनेत्री माधुरी पुरंदरे

मराठीतील कोसला, वाडा चिरेबंदी, बलुतं अशा दर्जेदार पुस्तकांचा त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे तर वेटिंग फॉर गोदो, लस्ट फॉर लाइफ, हॅनाज सूटकेस अशी जगप्रसिद्ध पुस्तके मराठीत आणली आहेत. आमची शाळा, बाबाच्या मिश्या, हॅनाची सुटकेस, हात मोडला, जादुगार आणि इतर कथा, कोकरू, फ्लॅट नंबर थर्टी सिक्स, लिहावे नेटके, मासोळी आणि चिमुकलं पाखरू, मोठी शाळा, मुखवटे, पाचवी गल्ली, शाम्याची गंमत व इतर कथा, सिल्व्हर स्टार, सुपरबाबा, Yash Big School, Yash Guest, झाडं लावणारा माणूस, चित्रवाचन, कंटाळा, मामाच्या गावाला, मोतिया, सख्खे शेजारी, वाचू आनंदे, व्हिन्सेट व्हॅन गॉग, परी मी आणि हिप्पोपोटॅमस, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. […]

अनुवादक रवींद्र गुर्जर

‘पॅपिलॉन’ या पहिल्याच अनुवादित पुस्तकामुळे अफाट प्रसिद्धी मिळालेल्या गुर्जरांची आजपावेतो ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांनी केलेले सत्तर दिवस, गॉडफादर, सेकंड लेडी, बँको, कोमा, चार्ली चॅप्लिन, अल्बर्ट आइन्स्टाइन, इस्राइलची गरुडझेप, दी स्पाय हू केम इन फ्रॉम दी कोल्ड, दी पेलिकन ब्रीफ, फर्स्ट टू डाय, सुवर्णयोगी यांसारखे एकाहून एक सरस अनुवाद तुफान लोकप्रिय ठरले आहेत. […]

जागतिक नृत्य दिवस

नृत्य.. डान्स.. आज प्रत्येक भारतीयाच्या नाही तर जगातल्या प्रत्येकाशी मनाचं वैश्विक नातं जोडणारा हा कलाप्रकार.. होय एकीकडे तेल, सिमावाद, धर्म अशा नानाविध प्रकारांनं जगात फक्त विरोधाच्या भिंती उभ्या राहत असताना, जगभरातल्या डान्स प्रकारांनी मात्र देश-परदेशातही प्रत्येक सजग मनात आपली मुळं घट्ट रोवलीय.. जगभरातल्या नृत्य प्रकारांबद्दल किती आणि बोलावं.. शब्द थिटं पडतील अस पदलालीत्य.. भुरळ या शब्दालाही क्षणक्षर मोह पडावा असा नृत्यआविष्कार आणि श्रवणीयपणाही मंत्रमुग्ध व्हावा असं मनमोहक संगीत..जागतिक नृ्त्याविष्काराचा आढावा घेतला की शब्दांच्या मर्यादा आणि कलेचा बेफामपणा ठायी ठायी दिसतो. […]

इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी

मुसोलिनीने विरोधकांना सोडले नाही. त्याने विरोधी पक्ष बरखास्त केले. त्यांच्या कार्यालयांना कुलूप ठोकले. त्यांचा इतका छळ केला की अनेक जण देश सोडून पळून गेले. एखाद्या विरोधकाला पकडले तर त्याला स्वतःचा बचाव करण्याचा, अपील करण्याचा हक्क देणारे कायदेच बदलून टाकले. कुणीही विरोधात बोलले की, मुसोलिनी ‘राष्ट्रवाद’चा मुद्दा सांगायचा. त्याने विरोधी पक्षाला तर संपवलेच, पण स्वतःच्या फॅसिस्ट पक्षातील त्याच्या विरोधकांच्या तोंडालाही कुलूप लावले. त्याच्या पक्षातील मातब्बर नेता दीनो ग्रांदीला राजदूत म्हणून लंडनला पाठविले, लिआंद्रो अर्पिनाती याला लिपारी बेटावर धाडले, सोफानी याला मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही. अशा तऱ्हेने मुसोलिनीची कार्यपद्धती सुरू होती. […]

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड

एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. सर्वप्रथम १९८५-९०, नंतर १९९०-९५ आणि नंतर १९९९-२००४ अशी त्यांची आमदारकीची कारकीर्द राहिली. धारावी मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केल. दरम्यान १९९३ ते ९५ या काळात ते राज्यमंत्री राहिले. यानंतर १९९९ ते २००४ त्यांनी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्रशिक्षण अशी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. […]

इराकचे एकेकाळचे हुकुमशहा सद्दाम हुसेन

सद्दाम हुसेन हे भारताचा मोठा फॅन होते. सद्दाम हुसेन प्रोग्रेसिव्ह विचाराचे होते. त्यांच्या काळात मुलीना शिक्षणासाठी बंदी नव्हती. मुली आधुनिक कपडे घालू शकत होत्या, नोकरी करू शकत होत्या. इंदिरा गांधीसारखी महिला भारतासारख्या मोठ्या देशावर राज्य करते याचे त्यांना आश्चर्य वाटायचं. इंदिराजी जेव्हा इराक दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा त्यांची सुटकेस सुद्धा सद्दाम हुसेन यांनी उचलली होती. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला पाठींबा देणारा सद्दाम हुसेनच होते. अस म्हणतात की भारताच्या प्रेमातुन त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचं नाव उदय ठेवलं. […]

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड.अपर्णा रामतीर्थकर

हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर २००८ पासून तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या. […]

1 53 54 55 56 57 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..