ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत मेहेंदळे
१९७२ पासून चंद्रकांत मेहेंदळे यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. गॉसिप ग्रुप या विजय बोंद्रे यांच्या संस्थेशी ते जोडले गेले. या संस्थेच्या अनेक नाटकांसाठी त्यांनी काम केले. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यानंतर ते विनय आपटे यांच्यासोबत त्यांच्या गणरंग या संस्थेत कार्यरत होते. विनय आपटे आणि त्यांची मैत्री होती. चंद्रकांत मेहेंदळे यांनी अरूण साधू यांच्या कादंबरीवर आधारित बहिष्कृत नाटक लिहिले. हे नाटक त्यावेळी लोकप्रिय झाले. […]