नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पोतदार

आशा पोतदार यांना आत्माराम भेंडे यांच्यामुळे ‘नरो वा कुंजरो वा’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचा उपयोग त्यांना अनेकानेक नाटके मिळण्यासाठी झाला. पुढे त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या व्यावसायिक नाटकांतही कामे केली. नंतर १९७१ साली रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘विसर्जन’ या नाटकाचा अनुवाद असलेल्या ‘माते तुला काय हवंय’ या नाटकात त्यांनी काम केले. या नाटकात नानासाहेब फाटक यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. हे नाटक लोकप्रिय झाले आणि या नाटकातील त्यांची भूमिका पाहूनच दिग्दर्शक ना.बा. कामत यांनी ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६२) या चित्रपटाची नायिका म्हणून त्यांची निवड केली. […]

ज्येष्ठ हार्मोनिअम वादक, गायक विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख

उत्तम दर्जाचे हार्मोनिअम संगतकार म्हणूनही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, गंगूबाई हनगल व भीमसेन जोशी अशा किराणा घराण्याच्या गायकांना विठ्ठलरावांनी समरसून साथ केलीच, शिवाय कुमार गंधर्व, सिद्धेश्वरी देवी, अझमत हुसेन खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर अशा ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या कलाकारांनाही ते तेवढीच रोचक संगत करत असत. […]

माजी राज्यसभा खासदार भारतकुमार राऊत

भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. […]

क्रिकेटपटू जॉन विस्डेन

विस्डेन हा इंग्लंडच्या दक्षिणेकडच्या ब्रायटन नावाच्या समुद्रकिनाऱ्यानजीकच्या सुंदर भागात राहायचा. विस्डेनची फलंदाजी बऱ्यापैकी चांगली असली तरी तो प्रामुख्यानं गोलंदाज म्हणूनच गाजला. पण दुर्दैवानं विस्डेनच्या कामगिरीचे अनेक तपशील नष्ट झाले असल्यामुळे त्याविषयी फारसं माहीत नाही. त्यातून वाचलेल्या माहितीनुसार लॉड्सवर दोन वेगवेगळ्या सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये विस्डेननं सुरुवातीपासून शेवटपर्यंत न थकता गोलंदाजी टाकली होती. तसंच अमेरिकेमध्ये एकदा त्यानं ६ चेंडूंमध्ये ६ बळी घेतले होते. […]

रमाबाई पंडिता

रमाबाई पंडिता यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी झाला. रमाबाई पंडिता या स्त्रियांचा सर्वांगीण विकास, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांची कर्तबगारी यांबाबत बुद्धिमत्ता व स्व- कर्तृत्वाच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही पायाभूत कार्य केलेल्या विदुषी! परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या विदुषी म्हणजे पंडिता रमाबाई होत. रमाबाई पंडिता यांचा जन्म अनंतशास्त्री व लक्ष्मीबाई […]

नाट्यनिर्माते संतोष कोचरेकर

‘संतोष, कसेही कर आणि एक गाढव घेऊन ये’… वडिल नाना कोचरेकर (नारायण धर्माजी कोचरेकर) यांनी फर्मान सोडले. संतोष कोचरेकर यांनी आजुबाजूला खूप शोधाशोध केली आणि कसेबसे एका माणसाकडून गाढव भाड्याने मिळवले. नानांनी त्या गाढवाला बाशिंग बांधले, मुंडावळ्या बांधल्या. सोबत वाजंत्री घेतली. माइक संतोष यांच्या हातात होता. ‘आज रात्रौ थिएटरमध्ये बघायला या, गाढवाचं लग्न. आहेराचा दर ३ रुपये, २ रुपये’. मालवणमधील लोक टकामका पाहू लागले. युक्ती सफल झाली आणि संध्याकाळी नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. […]

ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील

गेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (१९८१), ‘तरीही’(१९८५), ‘दिवसेंदिवस’(१९९२), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’(२००५) आणि ‘कदाचित अजूनही’(२०१७). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे. […]

कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर

कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील उगाव या गावी झाला. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील जनता विद्यालयात उगावकर यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. राम उगावकर हे आदर्श शिक्षक, कवी, शाहीर, गीतकार होते. ते सेवादलातही काम करत असत. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे […]

बडोद्याचे महाराज फतेहसिंग प्रतापराव गायकवाड

रणजी स्पर्धेत खेळणारे लोकसभेचे ते एकमेव खासदार होते. फतेहसिंग गायकवाड हे १९५७ ते १९६२, १९६२ ते १९६७, १९७१ ते १९७७ व १९७७ ते १९८० पर्यत कांग्रेस पक्षाचे बडोद्याचे सांसद होते. भारतातील टीव्हीवर समालोचन करण्याचा पहिला मानही त्यांना जातो. […]

भारताचे पहिले क्रिकेटपटू रणजीतसिंह

रणजीतसिंह यांनी जुलै १८९६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्या डावात १५४ धावा केल्या, या हंगामात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७८० धावा केल्या आणि डब्ल्यूजी ग्रेसचा विक्रम मोडला होता.३०७ डोमेस्टिक सामन्यांत रणजीतसिंहजी यांनी २४ हजार ६२९ धावा फटकावल्या. त्यात ७२ शतके आणि १०५ अर्धशतकांचा समावेश आहे. […]

1 71 72 73 74 75 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..