नवीन लेखन...

बहावा

माझ्या शेतात बहावा,
मोहरफुलांनी सजला,
आस डोळ्यात ती दाटं,
वाट पावसाची पाही…..!

कसा फुलला बहावा,
साज सोनेरी चढवुन,
जशी हळदिची नवरी,
बसली सजुनं धजुनं …!

फुलवा बहाव्याचा सांगे,
मेघराजाच स्पंदनं….
त्याच आगमन दमदार,
की तो बसेल रूसुनं….!

भिन्न पात्रे निसर्गाची,
पशु,पक्षी,झाडे वेली…
रंगमंच निसर्गाचा,
भुमिका जगती वेगळाली….!

©गोडाती बबनराव काळे, लातुर

9405807079

2 Comments on बहावा

  1. सर, बहावा वर खूप साऱ्या कविता आहेत. तसा फार लोकप्रिय वृक्ष आहे. कवी मनाला साद घालणारा आहे. माझा बहावा वृक्षावर एक लेख मराठी सृष्टीवर नुकताच प्रकाशित झा आहे. असो. कविता उत्तम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..