नवीन लेखन...

सिक्कीम मधील चांगु लेक

निसर्गाचा वरदहस्त असलेले पूर्व उत्तरेकडील सर्वात लहान राज्य सिक्कीम ७०९६ स्कवे,किमी विस्तार . ३ लाख लोकवस्ती. नेपाळ, भूतान, चीन देशांच्या सीमांना भिडलेले. सदाबहार हिरवाई. आकाशाला भिडणारी हिमशिखरे. त्तीतसा  नदीचे विशाल पात्र,धबधबे,सरोवरे, आणि थंडीत सरोवराचा होणारा बर्फाचा समुद्र. डोळ्याचे पारणे फिटविणारा प्रदेश. येथे जाण्यास गंगटोक हे राजधानीचे शहर गाठावे लागते.उत्तम टॅक्सीची सोय व छाती दडपून टाकणारे घाटाचे रस्ते.गंगटोक उंची ६०००फूट तर नाथूला पास १४६०० फूट. ५५ किमीचा रस्ता. यावर वाटेत ३० किमी वर भव्य चांगु सरोवर. १२३१० फूट उंचीवर पांढऱ्या शुभ्र दगडासारख्या घट्ट बर्फाचा समुद्र पसरलेला होता. ३ ते ५ किमी व्यास असलेल्या सरोवरात पाणी म्हणून दिसत नव्हते.आकाश ढगाळलेले. सूर्य डोकावत होता आणि सरोवराचा काही बर्फ चकाकत होता.भ्रर दुपारी दोन वाजता मी मी म्हणणारी थंडी,बर्फावरून चालण्याचा थोडा प्रयत्न केला पण पावले उचलणे महाकर्मकठीण होते.सरोवराच्या मध्यात एक उंच बांबू दिसत होता.बाकी काही म्हणजे काही दिसत नव्हते.सर्व बाजुनी बर्फ एके बर्फ. तासभर अवाक होऊन पाहात होतो.सर्व बाजूनी बर्फाच्या पांघरुणाने लपेटलेले आकाशाला भिडलेलले डोंगर व मध्यात अस्ताव्यस्त पसरलेला लेक. ना कुठे झाड ना कुठे पाण्याचा भाग,लांबी रूंदीचा अंदाजच करता येत नव्हता.लेकच्या बाजूने चालण्याचा रस्ता.तेथे फिरण्यासाठी ७ ते ८ सजविलेले काळे याक. त्यावर बसून फिरणे म्हणजे एक कसरतच होती.लेकच्या खोल्रीचा अंदाज करणे अशक्यच.उन्हाळ्यात एकदम कायापालट.सरोवराचा परिसर हिरवागार,पाणी इतके नितळ आणि निळे,त्यात बाजूच्या निसर्गाचे रम्य प्रतिबिंब पडते.शेकडो वर्षापूर्वी लामा गुरु पाण्याचा नितळ पणा व आकाशातील विविध रंगछटावरून  वरून पुढील काळाचे भविष्य सांगत.

डॉ. अविनाश केशव वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..