नवीन लेखन...

विनोदी नट राम नगरकर

राम नगरकर हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून. तेही एक विनोदी नट म्हणून प्रख्यात अभिनेते राम नगरकर यांनी मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसविले. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९३० रोजी झाला. ‘रामनगरी’ हे त्यांच्या आत्मकथनाचे धम्माल विनोदी पुस्तकही खूप गाजले. महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरविले. ‘रामनगरी’ ला पुलंची प्रस्तावना आहे. त्यामुळेच हे पुस्तक तमाम मराठी जनतेने डोक्यावर घेतले. या पुस्तकावरून ‘रामनगरी’ या हिंदी सिनेमाचीही निर्मिती झाली होती व त्यात अमोल पालेकर हे प्रमुख भूमिकेत होते. हे सर्व होत असताना ‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम १९८० साली मा.राम नगरकर यांनी सुरु केला. याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले. त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा नेहमीच पाहायला मिळाला. स्वतःची थट्टा-मस्करी करणाऱ्या या कलावंताने आपल्या अदाकारीने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.‘‘ दादा कोंडके, निळू फुले हे नगरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. १९९५ साली मा.राम नगरकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांनीही रामनगरीचे असंख्य प्रयोग केले आहेत. रामनगरी हे राम नगरकर यांचे आत्मचरित्र खूपच गाजले आहे.

राम नगरकर यांचे ८ जून १९९५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..