नवीन लेखन...

मलेरियाचा इतिहास – भाग ४

प्रथम मलेरिया या शब्दाची फोड म्हणजे साचलेले पाणी व पाण्याच्या डबक्या तून निघणारे विषारी वायू अशी केली जात असे. इटालियन शब्द मलेरिया (Mala-दूषित, aria-हवा) म्हणजेच Mal’aria या शब्दापासून Malaria असा शब्द तयार झाला.

इ. स. १७४० मध्ये या विशिष्ट ज्वराला मलेरिया हे नाव इंग्लिश लेखक होरेस वाम्पोत्र यांनी दिले. इ.स. १७४३ मध्ये जॅक्वीयर व इ.स. १७५० मध्ये टॉर्टी यांच्या ग्रंथात मलेरिया या संज्ञेचा उल्लेख आहे.

क्रिस्टोफर कोलंबस आपल्या आफ्रिकन गुलामांसह अमेरिकेत मलेरिया घेऊन आले आणि त्याचा तेथे झपाट्याने प्रसार झाला. अमेरिकन यादवी युद्ध काळात ५० टक्के गोरे ८० टक्के नागरिक मलेरियाग्रस्त होते.

पुढील तीन शतके जसजसा व्यापार व देशादेशांमधील युद्ध वाढत गेली तसतसा मलेरियाचा प्रसार जगभर झाला. एकोणिसाव्या शतकात तर मलेरियामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या इतकी होती की दर दहा मलेरियाग्रस्त रुग्णांपैकी एकाचा मृत्यू अटळ होता. जगाचा इतिहास पाहताना मलेरियामुळे गेल्या तीन ते चार हजार वर्षात लक्षावधी लोकांचे बळी घेतले गेले आहेत. त्यामधील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची जंत्री बरीच मोठी आहे. मलेरिया सदृश्य ताप व त्याचे शरीरावर झालेले दुष्परिणाम यावरील निदानावरून हा मलेरियाचा रोगी होता असा निव्वळ तर्कच आहे, कारण त्या काळात परोपजीवींचा शोधही लागलेला नव्हता. तसेच डास व मनुष्य यांचे आपापसातील नातेही ठामपणे सिद्ध झालेले नव्हते. परंतु देश आदेशाप्रमाणे विविध पद्धती त्या काळात वापरल्या जात असत.

–  डॉ.  अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..