नवीन लेखन...

जानेवारी १२ : बापू नाडकर्णींची सलग २१ निर्धाव षटके

१० जानेवारी १९६४ रोजी भारत वि. इंग्लंड मालिकेतील पहिला कसोटी सामना मद्रासच्या कॉर्पोरेशन स्टेडिअमवर सुरू झालेला होता. भारताचे कर्णधार होते पतौडीचे धाकटे नवाब. त्यांनी नाणेकौल जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि दुसर्‍या दिवशी ७ बाद ४५७ धावांवर डाव घोषित केला. बुधी कुंदरन १९२, विजय मांजरेकर १०८. फ्रेड टिटमस ५०-१४-११६-५.

दुसर्‍या दिवस-अखेर इंग्लंडने २ बाद ६३ अशी मजल मारली होती. १२ जानेवारीला (सामन्याच्या तिसर्‍या दिवशी) दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुणे ४ बाद २३५ पर्यंत पोचलेले होते. १३ जानेवारी या विश्रांतीच्या दिवसानंतर १४ जानेवारीला इंग्लंडचा डाव ३१७ धावांवर संपुष्टात आला. चंदू बोर्डे ६७.४-३०-८८-५. या डावादरम्यान रमेशचंद्र गंगाराम ऊर्फ ‘बापू’ नाडकर्णी या डावखुर्‍या फिरकीपटूने तब्बल २१ संपूर्ण षटके निर्धाव टाकली ! सलग १३१ चेंडूंवर धाव नाही ! सहा चेंडूंच्या ओव्हर साठी हा विश्वविक्रम होता.डावाअखेरीस त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण होते : ३२-५७-५-०. दुसर्‍या डावात गोलंदाजी करताना मात्र त्यांनी तब्बल स-हा धावा दिल्या : ६-४-६-२. कर्णधार माईक स्मिथ आणि यष्टीरक्षक जिम पार्क हे दोघे नाडकर्णीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाले.

एका ओव्हर मधील चेंडू१९७९-८० च्या हंगामापासून कसोटी क्रिकेटमध्ये एका ओव्हर मधील चेंडूंच्या बाबतीत एकवाक्यता आली आणि सर्वत्र ‘षटकेच’ फेकली जाऊ लागली. त्याआधी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये ८ चेंडूंची ओव्हर, दक्षिण आफ्रिकेत ५ आणि ८ चेंडूंची ओव्हर, ऑस्ट्रेलियात ४ आणि ८ चेंडूंची ओव्हर तर दस्तुरखुद्द इंग्लंडमध्ये ४, ५ आणि ८ चेंडूंची ओव्हर असे प्रकार अस्तित्वात होते. (सात चेंडूंची ओव्हर मात्र कधी कुठे असल्याचे उल्लेख आढळत नाहीत.)

सलग निर्धाव ओव्हर्स (प्रथमश्रेणी सामने)४ चेंडूंच्या २३ ओव्हर्स : आल्फ्रेड शॉ. १९७६.५ चेंडूंच्या १० ओव्हर्स – अर्नी रॉब्सन. १८९७.६ चेंडूंच्या २१ ओव्हर्स – बापू नाडकर्णी. १९६४.८ चेंडूंच्या

१४ ओव्हर्स – ह्युग टेफिल्ड. १९५६-५७.

ओव्हर या संज्ञेसाठी ‘षटक’ हा शब्द मराठीत वापरला जातो मात्र सहा चेंडूंच्या ओव्हर पुरताच तो अर्थवाही ठरतो. तेव्हा, ओव्हर साठी सर्व अर्थच्छटा दाखवू शकणारा शब्द कुणी सुचवू / शोधू / बनवू शकेल काय?

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..