नवीन लेखन...

कापडी पिशव्या बनविणारा अनिरुध्द बचत गट

आज अनेक कारणांमुळे पृथ्वी वरील पर्यावरणाचा तोल ढासळू लागला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वच स्तरांवर होत आहे. या दृष्टीकोनातून जगात सर्वत्र प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड व पुणे शहरात शासनाने प्लास्टिक वर बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचा लाभ अनिरुध्द बचत गटाच्या महिलांनी घेतला. बाजारात प्लॉस्टिक पिशव्यावर बंदी असल्याने ग्राहकांना कापडी पिशव्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. हा दृष्य विचार करुन या महिला काम करीत आहेत.

पर्यावरण योग्यतेप्रमाणे राखले जावे आणि लोकांनाही उपयोग व्हावा यासाठी जुनी सांगवीतील अनिरुध्द बचत गटाने प्लास्टिक पिशव्यांऐवजी बाजारामध्ये साड्यांऐवजी बाजारामध्ये साड्यांच्या कापडी पिशव्या वापरासाठी आणल्या आहेत. या बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता अहिरराव म्हणाल्या, सध्याची प्लास्टिक पिशव्यांची समस्या लक्षात घेता कापडी पिशव्या शिवून वाटण्याची कल्पना मांडण्यात आली. त्यानुसार बचत गटाच्या मिटींगमध्ये इतर महिलांसमोर ही कल्पना उपाध्यक्षा सुनीता मैंद्रे यांनी मांडली. त्यानुसार कापडी पिशव्या शिवण्याचे काम तडीस नेले गेले. बाहेरील कापड न आणता २५ ते ३० साड्यांच्या एकूण ५०० ते ५३० च्यावर पिशव्या तयार होतात.

या बचत गटाची स्थापना १६ डिसेंबर २००९ साली माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. वर्षभरात या बचत गटाने हळदी-कुंकू, उन्हाळ्यातील वाळवणे, कुकिंगचे क्लासेस, बचत गटातील महिलांचे वाढदिवस साजरे करणे, रक्तदान शिबिर, महिलांसाठीची शिबिरे आदी विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले आहेत. महिलादिनानिमित्त कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. बचत गटामध्ये सुनीता मैंद्रे (उपाध्यक्षा), स्वप्ना जाधव, वैशाली मैंद्रे, मंगला करंजकर, पल्लवी करंजकर, मोहिनी करंजकर, दीपा जाधव, ललिता चौगुले,कविता शितोळे, प्रिती लायगुडे, प्रमिला जाधव, राजश्री करंजकर, अनिता पगारिया, शांता ढगे आदींचा सभासद म्हणून समावेश आहे.

पर्यावरणाचा ढासळणारा समतोल राखण्याची सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबर कुटुंबाला आर्थिक हातभार लावणार. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. शासनाच्या प्लास्टिक बंदीचा अचूक लाभ या महिला बचत गटाने घेतला आहे. असे उपक्रम इतर महिला बचत गटांनी राबविल्यास प्लास्टिक बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी तर होईलच शिवाय महिलांनाही आर्थिक लाभ होईल.

(महान्यूजच्या सौजन्याने)

— बातमीदार

53 Comments on कापडी पिशव्या बनविणारा अनिरुध्द बचत गट

  1. आमचे कडे प्रशिक्षीत महिला आहेत
    बॅगचे कापड कोठे मिळेल सांगा
    मोबाईल नंबर-९५१८७०६७२१

  2. कापडी पिशव्या शिवने हा व्यवसाय कसा करावा मो 7798863234

  3. मला पण कागदी पिशव्या चे काम करायचे आहे पुणे ते कुठे आहे माझं नंबर ९४०५०३५२९५ आहे Shweta joshi

  4. वापरायला मजबूत आकर्षक अशा कापडी पिशव्या आमच्या कडे उपलब्ध आहेत संपर्क अर्पिता जोशी ९२८४३८१७४७
    पर्यावरणपूरक आणि कालसुसंगत विचार करा !
    कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करा !

  5. मला पिशवी बांवण्यासाठी कापड पाहिजे किती रुपये मीटर मिळेल

  6. कुणाला कापडी पिशव्या हव्या असल्यास कृपया आम्हाला सम्पर्क करावा
    रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज
    मधमिता बर्वे 9422000638
    संगीता काकडे 8888860391
    विनय नेवसे 9822095151

  7. अंध मुलींनी तयार केलेल्या कापडी पिशव्या कुठे विकावी?

  8. कापड कोठे मिळेल दहा महिलांना काम पाहीजे 9921542253 या नंबरवर माहिती द्या

    • मला सु.बेरोजगार युवा संघ या संस्थेमार्फत सदर उद्योग महाराष्ट्र भर सुरु करावयाचा आहे संस्थेचे महाराष्ट्रात १०००० सभासद आहे क्रुपया सविस्तर माहीती मिळावी

  9. अनिरुद्ध बचत गटाचा नंबर मिळू शकेल का असल्यास 9822095151 या नंबरवर कळवा

  10. कापडी पिशवी व कागदी पिशवी बनवण्यासाठी लागणारी मशनरी कुठे मिळते

  11. पिशवी साठी लागणारे कापड आमच्याकडे मिळेल.
    पिशवीसुध्दा हव्या त्या साईज मध्ये बनवुन मिळेल.

  12. अनिरूद्ध बचत गटाचा नंबर मिळु शकेल का ? असेल तर मला संपर्क कण्यात यावा 7083557803

  13. सर मँडम अतिशय चांगले काम आहे

Comments are closed.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..