नवीन लेखन...

करायचं आता काय ?

-विजय कुवळेकर

रेडा ऱ्हायला  गाभन आनिक म्हशीनं खाल्ली हाय
आक्रित आक्रित घडतंय समदं करायचं आता काय ?
सांगा करायचं आता काय ? ||

सखे म्हनाले,” तुम्हास्नी न्हाई ठाऊक आमची पावर”
“येवढं हाय तर ” म्हनलं ” हिंमतीनं गुंडान्ला घाला आवर”
“कुनाला सांगतोस,बेट्या” म्हनाले ; धरून सुऱ्याचा नेम
“करीन” म्हनाले,” तुमच्यासारख्या घुंगुरट्यांचा गेम ”
दमच भरला त्यांनी; म्हनाले,” परत बोलायचं नाय” || १ ||

डासानं मारला मानूस तेव्हा बॉस म्हनाले,”बास ,
“समद्यान्ला लावतो कामाला ह्यावर इलाज काढतो खास ”
भूतदयेचा पुळकावाल्या बाबाला झाला त्रास
“खबरदार जर कराल ” म्हनाला,” पर्यावरनाचा ऱ्हास ”
काय बी पेटूदे .. आगीवर ह्यांची पोळी भाजायची हाय || २ ||

तंबाखू चोळत ग्यानबा बसला …चुन्यात मिसळला कात
कोन मारतोय डोळा कुनाला… कुनाची रंगते रात
कुनाचा पायपोस कुनाच्या पायात…कुनाला कुनाची साथ
खरी कळावी कशी कुनाला पडद्यामागची बात
समदेच करत्यात कसं येड्याला दे माय धरनी ठाय || ३ ||

-विजय कुवळेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..