उन्हाची काहिली सुरु झाली,
वसंताची चाहूल पक्षांना लागली !
झाडं पालवीने हिरवीगार झाली,
रंगीबेरंगी फुलाने बहरली !
वसंतात तू सुंदर गातोस,
गाणे ऐकून कावळा लाजतो !
हाकुठला गायक, म्हणतो कावळा
नओळखण्याइतपत मी काय बावळा !
इंग्रज देश सोडून गेले,
तुझी आठवण नाही विसरले !
कवी वुड्सवर्थ आणि किपलिंगनी
प्रेमाने तुझ्यावर काव्ये लिहिली !
तू कुहूकुहूने आसमंत भरतोस,
माझी प्रेमाने विनवणी करतोस !
मीही तेवढीच महा बेरकी,
ऐकून न ऐकल्यासारखे करी !
कुहूकुहूने माझी फसगत होते,
अशीच मोबाईलची रिंगटोन वाजते !
वाटते काहीतरी रोमँटिक कर,
मला फेसबुकवरून प्रपोज कर !
न लागे तुझी गोड कुहूकुहू,
आंबे पिकती रसायनाने हळूहळू !
आता कळलेना तुला सगळे,
आताशा आंब्याला मोहर येतनाही कुहूकुहूने !
मी वेडी मंजुळ कुहूकुहूची वाट बघते,
तुझ्यावर जीव आवळून टाकते !
जगदीश पटवर्धन
Leave a Reply