नवीन लेखन...

वेळीच ‘नाही’ म्हणायला शिका!

‘प्रेमा तुझा रंग कसा’, या वाक्याचा अर्थ आपल्याला सभोवताली हातात हात घेऊन हिंडणार्‍या…किंवा एकमेकांच्या बाहूपाशात हरवलेल्या…किंवा एखाद्या समुद्रकिनारी एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या ‘कपल्स’कडे पाहिल्यानंतर कळतो. प्रेमाचा रंग तसा गुलाबी! पण, तो अचानक कसा बदलेल, याचा मात्र काही नेम नाही. तो रंग बदलवणारे आपणच असतो. प्रेमामध्ये आपल्या मनाविरूध्द होत असेल तर एकदम ‘नाही’ कसं म्हणायचं? म्हणून…मन इथे कच खाते.

‘त्याला’ किंवा ‘तिला’ वाईट वाटले तर… ‘तो’ किंवा ‘ती’ दुखावेल… अशा अनेक गोष्टीचा आपण विचार करत असतो. त्यामुळे ‘त्याने’ किंवा ‘तिने’ म्हटल्यानुसार आपण वागत असतो. ‘तो’ किंवा ‘ती’ आपल्यावर आपल्या मनाविरूध्द असणार्‍या गोष्टीही आपल्यावर लादून ‘हक्क’ सांगत असतो आणि आपण इच्छा नसताही ते स्वीकारत असतो. परंतु, यात आपली चूक म्हणजे आपल्याला ‘नाही’ म्हणता येत नाही. अर्थात ‘नकार’ देता येत नाही. परंतु, प्रेमात मनाविरूध्द होणार्‍या गोष्टीना नकार दिलाच पाहिजे.
‘तो’ म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा… मोजकेच कपडे परिधान करत जा… केस कशाला वाढवतेस…. केस तू कापलेच पाहिजे. असा ‘त्याचा’ हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर ‘एकत्र’ आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् ‘ती’ मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला ‘तो’ सांगतो, तसं करावंच लागतं….

‘प्रेम’ जुळते तेव्हा चांगला, वाईट असा भेद आपण करत नसतो. तर मग समोरच्याने आपण सांगितलं तसंच केलं पाहिजे हा आग्रह कशासाठी? प्रेमात आपण एकमेंकांना गुणदोषांसहित स्वीकारले असते. एकमेकांनी चांगल्या समन्वयाने आपल्यातील दोषांचे रूपांतर गुणांमध्ये केले पाहिजे. दोघांनी आपला स्वाभिमान शाबूत ठेवला पाहिजे.

प्रेमात मनाने आपण एकमेकांच्या जवळ आलो असतो तशी शरीराने ही जवळ येण्याची अपेक्षा असतेच. स्पर्शाची भाषा समजलेली असते. नको म्हणता म्हणता थोडं पुढे… थोडं मागे पाहत आपली प्रेमाची गाडी पुढे सरकत असते. अशा वेळा ‘त्याला’ किंवा ‘तिला’ नाही म्हणणं थोडं अवघडच जात असतं. ‘नाही’ म्हटलं तर ‘तो’ किंवा ‘ती’ आपल्याला सोडून तर जाणार नाही ना! अशा भीतीमुळे ‘तो’ किंवा ‘ती’ मन मानत नसतांना ही आग्रहाला बळी पडत असतात. भविष्यात त्याच्याकडून तिच्या व तिच्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. त्यामुळे ‘नाही’ म्हणण्याची आपल्याला संधीच मिळत नाही. म्हणून रामायण घडण्याच्या आधीच ‘नाही’ म्हणणेच ‘त्याच्या’ किंवा ‘तिच्या’साठी गरजेचे असते.

— संदीप रमेश पारोळेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..