मुरेल बेकचा जन्म ८ जून १९१८ रोजी लंडन येथे ज्यू कुटुंबात झाला.त्यांचे कुटुंब १९२३ ला विसबेडन जर्मनी येथे स्थायिक झाले व तिथून ते १९२६ मध्ये फ्रांस येथे गेले.तिचे शिक्षण फ्रांस मध्येच झाले. १९३५ मध्ये तिने लिली विश्वविद्यालयात दाखला घेतला. १९३६ ते १९३८ मध्ये तिने एका कंपनीत सचिव म्हणून काम केले. त्याच बरोबर १९३७ मध्ये गेट थिएटर मध्ये सहायक स्टेज मॅनेजर म्हणूनही काम केले.दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिने रेड क्रॉसमध्ये दाखला घेतला. १९४१ ला ती टोऱ्कयू येथे गेली व असिस्टंट क्लार्क व वॉर्डन चे काम पाहू लागली. १९४२ मध्ये ती वुमन एअर फोर्स मध्ये गेली आणि ड्यूटी क्लार्क चे काम पाहू लागली. नंतर तिचे प्रमोशन सेक्शन ऑफिसर म्हणून झाले.
तिचे फ्रेंच उत्तम होते म्हणून तिला स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव गुप्तहेर संघटनेत १९४३ मध्ये दाखल करून घेण्यात आले.सप्टेंबर १९४३ मध्ये तिचे सूरी येथे प्रशिक्षण सुरू झाले. पुढे तिचे para-military फोर्सचे शिक्षण सुरू झाले. व पुढे वायरलेस ऑपरेटर चे प्रशिक्षण घेतले. एसओई मध्ये तिला गुप्तहेरीचे काम देण्यात आले.गुप्तहेराचे सर्व आवश्यक गुण तिच्यात होते. ८ एप्रिल १९४४ रोजी तिला पॅरॅशूटने फ्रांस मध्ये उतरवण्यात आले. तिचे कोडनाव व्हायोलेट ठेवण्यात आले. तिने सालब्रासिस येथे सुरक्षित घर मिळवले. तिने ट्रान्समिशन यंत्र गेरेजच्या शेड मागे लपवले जेथे जर्मन जीप व ट्रक दुरुस्ती साठी येत असत.तिथे तिला संशयित जर्मन सैनिक दिसले . तिने यंत्र दुसरीकडे हलवले.ती पर्शियन सेक्रेटरी बनली. तिथून ती एका लोहाराच्या घरी राहू लागली. खूप वेळ काम केल्यामुळे तिला ताण आला व ती बेशुद्ध झाली. तिला तातडीची वैद्यकीय गरज होती तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. तिथे meningitis चे निदान झाले व तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले,पण प्रत्येक हॉस्पिटलवर जर्मनांचा पहारा होता. तिला नन्स द्वारा चलवणाऱ्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. पण काही उपयोग झाला नाही २५ मे १९४५ रोजी वयाच्या 27 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.
Leave a Reply