नवीन लेखन...

म्युरील बेक-दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मुरेल बेकचा जन्म  ८ जून १९१८ रोजी लंडन येथे ज्यू कुटुंबात झाला.त्यांचे कुटुंब १९२३ ला विसबेडन जर्मनी येथे स्थायिक झाले व तिथून ते १९२६ मध्ये फ्रांस येथे गेले.तिचे शिक्षण फ्रांस मध्येच झाले. १९३५ मध्ये तिने लिली विश्वविद्यालयात दाखला घेतला. १९३६ ते १९३८ मध्ये तिने एका कंपनीत सचिव म्हणून काम केले. त्याच बरोबर १९३७ मध्ये गेट थिएटर मध्ये सहायक स्टेज मॅनेजर म्हणूनही काम केले.दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिने रेड क्रॉसमध्ये दाखला घेतला. १९४१ ला ती टोऱ्कयू येथे गेली व असिस्टंट क्लार्क व वॉर्डन चे काम पाहू लागली. १९४२ मध्ये ती  वुमन एअर फोर्स मध्ये गेली आणि ड्यूटी क्लार्क चे काम पाहू लागली. नंतर तिचे प्रमोशन सेक्शन ऑफिसर म्हणून झाले.

तिचे फ्रेंच उत्तम होते म्हणून तिला स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव गुप्तहेर संघटनेत १९४३ मध्ये  दाखल करून घेण्यात आले.सप्टेंबर १९४३ मध्ये तिचे सूरी येथे प्रशिक्षण सुरू झाले. पुढे तिचे para-military फोर्सचे  शिक्षण सुरू झाले. व पुढे वायरलेस ऑपरेटर चे प्रशिक्षण घेतले. एसओई मध्ये तिला गुप्तहेरीचे काम देण्यात आले.गुप्तहेराचे सर्व आवश्यक गुण तिच्यात होते. ८ एप्रिल १९४४ रोजी तिला पॅरॅशूटने फ्रांस मध्ये उतरवण्यात  आले. तिचे कोडनाव व्हायोलेट ठेवण्यात आले. तिने सालब्रासिस येथे सुरक्षित घर मिळवले. तिने ट्रान्समिशन यंत्र गेरेजच्या शेड मागे लपवले जेथे जर्मन जीप व ट्रक दुरुस्ती साठी येत असत.तिथे तिला संशयित जर्मन सैनिक दिसले . तिने यंत्र दुसरीकडे हलवले.ती पर्शियन सेक्रेटरी बनली. तिथून ती एका लोहाराच्या घरी राहू लागली. खूप वेळ काम केल्यामुळे तिला ताण  आला व ती बेशुद्ध झाली. तिला तातडीची वैद्यकीय गरज होती तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. तिथे meningitis चे निदान झाले व तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले,पण प्रत्येक हॉस्पिटलवर जर्मनांचा पहारा होता. तिला नन्स द्वारा चलवणाऱ्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. पण काही उपयोग झाला नाही २५ मे १९४५ रोजी वयाच्या 27  व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..