नवीन लेखन...

निवृत्तीची वृति

माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी
दूर ही जावूनी खंत न वाटे,  घडत असते कसे मनी…१,

बहुत वेळ तो घालविला,  फुल बाग ती करण्यामध्ये
विविध फूलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे….२,

कौतुकाने बांधी घरकूल,  तेच समजूनी ध्येय सारे
कष्ट करूनी मिळवी धन,  खर्चिले ते ह्याच उभारे…३

संसार करूनी वंश वाढवी, संगोपन ते करूनी त्यांचे
थकूनी जाई देह आता तो,  चित्त लागते प्रभू चरणाचे…४,

ओढ आतां उरली न काही,  ज्याच्यासाठी तगमगलो,
निवृत्तीची वृत्ती मिळूनी,  समाधानी तो होऊ शकलो…५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..