माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी
दूर ही जावूनी खंत न वाटे, घडत असते कसे मनी…१,
बहुत वेळ तो घालविला, फुल बाग ती करण्यामध्ये
विविध फूलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे….२,
कौतुकाने बांधी घरकूल, तेच समजूनी ध्येय सारे
कष्ट करूनी मिळवी धन, खर्चिले ते ह्याच उभारे…३
संसार करूनी वंश वाढवी, संगोपन ते करूनी त्यांचे
थकूनी जाई देह आता तो, चित्त लागते प्रभू चरणाचे…४,
ओढ आतां उरली न काही, ज्याच्यासाठी तगमगलो,
निवृत्तीची वृत्ती मिळूनी, समाधानी तो होऊ शकलो…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply