नवीन लेखन...

जिवाला ओढ लावणारी “वर्षाअखेर!”

मंडळी सप्रे म नमस्कार !

आज मंगळवार — २६ डिसेंबर २०२३.आजपासून ५ दिवसांनी हे वर्ष संपेल.आपल्या संस्कृतीविषयी जरूर प्रेम असावं पण ते दुसर्‍या संस्कृतीचा तिरस्कार करण्याएवढं कट्टर नसावं !हे लिहिण्याचा उद्देश एवढाच की , आमचं नवीन वर्ष गुढी पाडव्याला सुरु होतं ! आम्ही नाही आज कुणाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार किंवा कुणाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा घेणार वा स्वीकारणार पण नाही!

अश्या कट्टर मताचेही आमचे कित्येक मित्र—मैत्रिणी आहेत ! मग माझा त्यांना असं विचारावसं वाटतं की , पॅन कार्ड , आधार कार्ड , पासपोर्ट , जन्मतारखेचा दाखला….. सगळीकडे जन्मदिवस इंग्रजी कॅलेंडरनुसारच असतो ना ? की तिथे आपण लिहितो वैशाख शुद्ध चतुर्दशी शके अमुक तमुक ? मग जर ते ( नाइलाजास्तोवर का होईना! ) आपण स्वीकारलंय , तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला वा स्वीकारायला काय हरकत आहे ? बरं , आपल्या नववर्षालाही शुभेच्छा देतोच की आपण ! असो…..

विषय असा की , आणखीन ५ दिवसांनी हे वर्ष संपेल.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सरत्या वर्षात चषकांचे चषक , प्याले भरतील …..सरतील…..

पण पूँछमधे दहशतवाद्यांकडून मारले गेलेल्या आपल्या लष्कराच्या ५ जवानांची आठवण होईल का आपणां भारतीयांना ? आपल्या मुखी घास सुखी पडावा म्हणून रात्रंदिवस एक करणार्‍या या आणि अशा कित्येक लष्करी जवानांना , पोलिसांना , सुरक्षारक्षकांना , सफाई कामगारांना , सेवाभावी डाॅक्टर्स—नर्सेस—वाॅर्डबाॅईज आणि अश्या कित्येक लोकांची आठवण आपल्याला येईल ?

मी हे नकारार्थी लिहित नाहीये , पण आपल्या सुखासाठी स्वत:चं आयुष्य सेवाभावाने व्यतीत करणार्‍या कितीतरी लोकांचं ऋण आपण आठवायला नको का ? ज्या घरांनी अशी माणसं गमावली , त्या घरांतील इतर माणसं नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने करू शकणार नाहीत! एवढी जाणीव तरी आपल्याला असायला हवी , बरोबर ना ?

या वर्षाअखेर वरून आठवलं , मी पार्ला काॅलेजला असताना आमचा एक दोस्त सच्चिदानंद सखाराम पारकर नवीन वर्षाची डायरी मला द्यायचा.दस सीन्स असणार्‍या व सुविचार असणार्‍या त्या १९८१—१९८२ या डायर्‍या अजून आठवतात.मुळात असं आहे , की एखाद्याकडे भरपूर असलं तरी देण्याची वृत्ती असावी लागते ना ! ती ह्या आमच्या दोस्ताकडे कायमंच होती व आजही आहे , मोठ्या मनाचा दिलदार माणूस ! आम्ही काॅलेजला असताना १९८० साली दिक्षित रोडला शिवसागर हाॅटेलमधे पावभाजी हा प्रकार पहिल्यांदा मुंबईत आला.तेंव्हा हा आमचा दिलदार दोस्त आम्हां ३—४ मित्रांना घेऊन गुरुवारी तिकडे घेऊन जायचा व आम्हाला पावभाजी खाऊ घालायचा.तेंव्हा ती ५.२५ ₹ ला मिळायची.पण अश्या २ गुरुवारनंतर मी त्याच्याबरोबर जायचं टाळायला लागलो.तेंव्हा त्याने मला एकदा गाठून याचं कारण विचारलं.मी म्हणालो , अरे राजा , ३ महिन्यांचा गोरेगांव—विलेपार्ले रेल्वेचा पास काढल्यावर व पार्ले—दादर नाॅन कन्सेशनल पास काढल्यावर ( कारण ११ वी—१२ वी मी दादर टी.टी.ला अग्रवाल क्लासेस ला जायचो! ) उरलेले पैसे मी पाॅकेटमनी म्हणून वापरतो.आपल्या कँटीनला मिळणारा २५ पैसे चहा , ५० पैसे सामोसा सुद्धा मला फार वेळा खाता येत नाही ! मग ३—४ वेळा तू पैसे भरल्यावर , मी एकदा तरी बिल भरण्याएवढी माझी ऐपत नसताना मी कां तुझं फुकटचं खावं ? तुझी तशी अपेक्षा नाहीये मला माहित आहे रे , पण फक्त घेणं मनाला पटत नाही रे !

आज डायर्‍या खूप मिळतात , पण लिहिण्यासारखं काही नाही आणि त्यावेळच्या डायर्‍यांएवढं अप्रूपही आता राहिलं नाही ! पण वर्षाअखेर म्हटलं की सच्चिदानंदाची डायरी आठवते , शिवसागरची पावभाजी आठवते आणि डोळे भरून येतात ! हा माझा दोस्त आता पुण्याला रहायला गेलाय , पण तो अजूनही तसाच दिलदार व निष्कपट सरळ मनाचा आहे व माझ्या संपर्कात असतो कायम !

तर मंडळी , सांगण्याचा मुद्दा असा की…..

जाणार्‍या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाला आनंदाने सामोरं जाताना , या वर्षांत जे जे धन आपण गमावलं ( माझ्यालेखी धन म्हणजे ही अमूल्य अशी माणसं! ) ते जरूर आठवा , त्यांच्या घरच्यांसाठी दोन हात परमेश्वरापाशी जोडा आणि म्हणा

: Happy New Year !

कळावे ,
तुमचा दोस्त,

उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
मंगळवार—२६ डिसेंबर २०२३ — सकाळी ११.१२ वा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..