नवीन लेखन...

ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त

ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त.. बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..

उद्या दिनांक ६ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ७.३० मिनिटांनी शनी ‘धनु’ राशीत प्रवेश करेल. याचा अर्थ ‘मकर’ राशीला उद्यापासून साडेसातीचा फेरा राहिल तसंच ‘तूळ’ राशीची  साडेसाती उद्या संपेल.. तूळ राशीला पुढली ३० वर्ष साडेसाती लागणार नाही..!!

‘मकर’राशीवाल्यांना पूर्ण साडेसात वर्ष, ‘धनु’राशीवाल्यांना पांच वर्ष तर ‘वृश्चिक’राशीवाल्यांना साडेसातीची अखेरची अडीच वर्ष साडेसाती राहणार आहे..

साडेसातीत वाईटच होत किंवा फार त्रास होतो हा गैरसमज आहे. शनी ग्रहाइतका न्यायी ग्रह दुसरा कोणताही नाही..चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट, मग समोर कोणीही असो, म्हणणारा हा एकमेव ग्रह आहे..

साडेसाती हे आपण आपल्या साडेसाती लागेपर्यंत कळत-नकळत केलेल्या बऱ्या-वाईट कर्माचं फळ मिळण्याचा कालावधी असतो. थोडक्यात, न्यायालयात एखाद्या दीर्घकाळ चाललेल्या खटल्यातील वादी-प्रतिवादी यांचे वकील, दोन्ही बाजूचे साक्षीदार यांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती जसे निकाल पत्र वाचण्यास सुरुवात करतात, तसं आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या बऱ्या-वाईट कामाचे निकाल पत्र शनी महाराज या साडेसात वर्षाच्या कालावधीत आपल्याला ऐकवायला आणि लगेच बक्षीस किंवा शिक्षा द्यायला सुरुवात करतात..फरक एकच, इथे चिरीमिरी चालत नाही.

साडेसातीत वाईटच होत असं अजिबात नाही. साडेसातीच्या काळात अनेक लोक भरभराटीला आलेले मी पाहिलेले आहेत.

प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार, कुंडलीतील इतर ग्रहांच्या अनुकूलते-प्रतीकुलतेनुसार व व्यक्तीच्या वयानुसार या साडेसातीची फळं वेगवेगळी असू शकतात त्यामुळे फुकाचं टेन्शन घेऊ नये.

-नितीन साळुंखे
9321811091
astroganesh.in
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..