ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त.. बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..
उद्या दिनांक ६ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ७.३० मिनिटांनी शनी ‘धनु’ राशीत प्रवेश करेल. याचा अर्थ ‘मकर’ राशीला उद्यापासून साडेसातीचा फेरा राहिल तसंच ‘तूळ’ राशीची साडेसाती उद्या संपेल.. तूळ राशीला पुढली ३० वर्ष साडेसाती लागणार नाही..!!
‘मकर’राशीवाल्यांना पूर्ण साडेसात वर्ष, ‘धनु’राशीवाल्यांना पांच वर्ष तर ‘वृश्चिक’राशीवाल्यांना साडेसातीची अखेरची अडीच वर्ष साडेसाती राहणार आहे..
साडेसातीत वाईटच होत किंवा फार त्रास होतो हा गैरसमज आहे. शनी ग्रहाइतका न्यायी ग्रह दुसरा कोणताही नाही..चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट, मग समोर कोणीही असो, म्हणणारा हा एकमेव ग्रह आहे..
साडेसाती हे आपण आपल्या साडेसाती लागेपर्यंत कळत-नकळत केलेल्या बऱ्या-वाईट कर्माचं फळ मिळण्याचा कालावधी असतो. थोडक्यात, न्यायालयात एखाद्या दीर्घकाळ चाललेल्या खटल्यातील वादी-प्रतिवादी यांचे वकील, दोन्ही बाजूचे साक्षीदार यांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती जसे निकाल पत्र वाचण्यास सुरुवात करतात, तसं आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या बऱ्या-वाईट कामाचे निकाल पत्र शनी महाराज या साडेसात वर्षाच्या कालावधीत आपल्याला ऐकवायला आणि लगेच बक्षीस किंवा शिक्षा द्यायला सुरुवात करतात..फरक एकच, इथे चिरीमिरी चालत नाही.
साडेसातीत वाईटच होत असं अजिबात नाही. साडेसातीच्या काळात अनेक लोक भरभराटीला आलेले मी पाहिलेले आहेत.
प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार, कुंडलीतील इतर ग्रहांच्या अनुकूलते-प्रतीकुलतेनुसार व व्यक्तीच्या वयानुसार या साडेसातीची फळं वेगवेगळी असू शकतात त्यामुळे फुकाचं टेन्शन घेऊ नये.
-नितीन साळुंखे
9321811091
astroganesh.in
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply