नवीन लेखन...

पाहिलीत कां सांगा कोणी सीता मृगनयनी ? (राघवाची गाथा)

राम : ( सीताहरण झाल्यानंतर रामांचा विलाप) –
हे खग, मृग, हे तरुवर श्रेणी, हे अंबर अवनी
पाहिलीत कां सांगा कोणी सीता मृगनयनी ? १
मम सीता सौंदर्यखनी ।।

लावण्याची अनुपम मूर्ती
फिके तिजपुढे कांचन, मोती
पूर्णेंदूसम आभा वदनीं, घाली मज मोहिनी ।। २

जिला वराया धनू भंगलें
जनकसुतेनें हृदय जिंकलें
नभिंची ती दामिनी, जाहली रामाची स्वामिनी ।। ३

गर्भरेशमी वस्त्र त्यागुनी
वल्कल ल्याली राजनंदिनी
दिसे शोभुनी अधिक त्यांमधें दीप्त अप्सरेहुनी ।। ४

पर्णकुटी प्रासाद कराया
तिला आगळी अवगत माया
भेटे रात्रंदिनीं अयोध्या तिच्यामुळें विपिनीं ।। ५

एकलाच मज येउं देइना
हट्टच धरला संगें येण्यां
कैसी लपली आतां, लोटुन मला एकटेपणीं ? ६

तिजविण राघव निरर्थ आहे
जीवन तिच्यामुळे सार्थ आहे
व्यापुन टाकी अस्तित्वा माझी जीवनसंगिनी ।। ७

ज़ळे पालवी भाग्यद्रुमाची
नुरे पाकळी सुखकुसुमाची
वेरहवेदनाकाट्यांनी झालो घायाळ मनीं ।। ८

मरस्थलासम जीवन भासे
क्षणाक्षणाला ऊष्ण उसासे
क्लेशआतपीं सुकून गेलें नयनींचें पाणी ।। ९

अस्तित्वाचा स्रोत आटला
कंठीं व्याकुळ प्राण दाटला
फुंक चेतना ईशा, देउन सीता-संजीवनी ।। १०

– सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

जुन्नर येथील महाजनांचा गणपती

जुन्नर येथील महाजनांचा गणपती

जुन्नर गावातील शंकरपूरा भागात हे गणेश मंदिर आहे. या मूर्तीला ...

जुन्नर येथील जोशी गणपती

जुन्नर येथील जोशी गणपती

जुन्नर गावातील रविवार पेठेत हे मंदिर आहे. सुमारे ३०० वर्षापूर्वी ...

विनायक गावाजवळचा सिद्धी विनायक

विनायक गावाजवळचा सिद्धी विनायक

उरण गावाच्या पश्चिमेस १.६ किमी. अंतरावर विनायक नावाचे गांव आहे ...

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..