नवीन लेखन...

पपईपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

Processed Food from Papai

महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तैवान, हवाई, वॉशिंग्टन, को- १ व को-७ या जातींच्या लागवडीखाली आहे. पिकलेल्या पपईच्या फळामध्ये ‘ अ’ जीवनसत्त्व असते. म्हणून त्याचा उपयोग डोळ्यांच्या विकारांमध्ये केला जातो. दंतरोग, अस्थिरोग व उच्च रक्तदाब इत्यादी रोगावरही ते गुणकारी आहे.

कच्च्या परंतु पूर्ण वाढ झालेल्या फळापासून पेपेन तयार केले जाते. पेपेन काढल्यानंतर पिकलेल्या पपईला बाजारात चांगला दर मिळत नाही. अशी फळे जॅम तयार करण्यासाठीसुद्धा वापरली जातात. पूर्ण वाढ झालेल्या कच्च्या पपईला उभ्या चिरा देऊन काढलेल्या ओल्या किंवा वाळवलेल्या चिकास ‘पेपेन’ म्हणतात.

पपईची फळे ७०-७५ दिवसांची झाल्यापासून ते १००-११० दिवसांपर्यंत चीक काढला जातो. केएमएसचा ( पोटॅशियम मेटाबायसल्फेट) वापर करून चिकाची प्रत टिकवता येते. चीक व्हॅक्यूम ड्रायरमध्ये वाळवून त्याची पावडरही करता येते.

पेपेनला व्यापारीदृष्ट्या फार महत्त्व आहे. प्रामुख्याने मटण मऊ करण्यासाठी ते वापरतात. त्यामुळे मटण लवकर शिजते, पचनास हलके बनते व चवीस रुचकर लागते.

कातडी कमावण्याच्या कामात, बेकरी उद्योगात, कापड गिरण्यांमध्ये कपड्यांना चकाकी आणण्यासाठी, बीयर स्वच्छ करण्यासाठी, लॉंड्रीमध्ये कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी, पाचक औषधे तयार करण्यासाठी, कागद कारखान्यांमध्ये,  फोटोग्राफीमध्ये तसेच टूथपेस्ट, टूथ पावडर व चुइंगगम तयार करण्यासाठी पेपेनचा उपयोग होतो.

पेपेन काढण्यासाठी पपईच्या को- २, को-५, को-७ या जातींची लागवड केली जाते. या जाती तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत. पपईची वॉशिंग्टन ही जात खाण्यासाठी तसेच पेपेन काढण्यासाठी योग्य समजली जाते. पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या आकाराची कच्ची पपई, चुन्याचे द्रावण आणि साखरेचा पाक यांपासून टुटीफ्रूटी बनवता येते. प्लास्टिकच्या हवाबंद डब्यांमध्ये ती साठवता येते. पपईचा लगदा करून त्यापासून बनवलेल्या रसापासून जेली बनवता येते. निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये ती साठवता येते.

— डॉ. विष्णू गरंडे ( कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद, मुंबई

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..