नवीन लेखन...

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ड

भाग-१-ड

 भारताच्‍या बर्‍याच भागात मुघल काळात फारसी राजभाषा होती. तसं पहिलं तर कुतुबुद्दीन ऐबक पासून म्‍हणजे इसवी सन १२०६ पासून ते १८५७ पर्यंत अशी ७॥ शतकं भारताच्‍या बर्‍याच भागात अरबी-फारसी-तुर्की इत्‍यादी भाषांना मान होता. महाराष्‍ट्रात शिवाजीपर्यंत व कर्नाटकात विजयनगरच्‍या काळापर्यंत ह्याच भाषांचं राजकीय प्राबल्‍य होतं. पण त्‍यामुळे भारतीय भाषांचं अस्तित्‍व लोपलं नाही, कारण त्‍या लोकभाषा होत्‍या, सर्वसाधारण जनता त्‍यांचाच उपयोग करत होती – त्‍या इथल्‍या लोकांच्‍या मातृभाषा होत्‍या व आहेत, म्‍हणून त्‍या टिकून राहिल्‍या.
एक गोष्‍ट लक्षात ठेवायला हवी की राज्‍यकर्त्‍यांना राज्‍य करायचं असतं. त्‍यांचं लक्ष्‍य वेगळं असतं. लोकभाषेला नामशेष करायचा प्रयत्‍न ते कशाला करतील? औरंगजेबासारख्‍या कट्टर धर्माभिमानी राजानंही ते केलं नाहीं. इंग्रजांनीही ते राज्‍यकर्ते असतांना तसा प्रयत्‍न केला नाही आणि केला असता, तर तो असफल झाला असता. आणि इंग्रजी राजभाषा असतांना जे करूं शकली नाहीं, ते आज ती कशी करू शकेल? जे राजसत्तेचं तेंच अर्थसत्तेचंही आहे.

माझे मित्र श्री. निशिगंध देशपांडे आपल्‍या एका लेखात म्‍हणतात की, अर्थकारणामुळे भाषा नष्‍ट होऊ शकते. माझ्याशी बोलतांना त्‍यांनी त्‍यासाठी आदिवासींचं उदाहरणही दिलं होतं. भारतीय आदिवा‍सींची भाषा नष्‍ट झाली काय याचा शोध घ्‍यायला हवा. (मी याबद्दल साशंक आहे. पण तसं झालं असल्‍यास, त्‍याचं कारण वेगळंच असणार आहे , असं मला वाटतं) .

 भाषा नष्‍ट होऊ शकते ती मुख्‍यत्‍वे राजकीय किंवा आर्थिक कारणांमुळे नव्‍हें. तर मुख्‍यत्‍वे सांस्‍कृतिक कारणांमुळे. आम्‍ही जर आमची संस्‍कृती सोडली, तर आमची भाषा नष्‍ट होऊ शकेल. परंतु आमची संस्‍कृती हजारो वर्षे जुनी आहे. आम्‍हाला आमच्‍या संस्‍कृतीचा अभिमान आहे. आमच्‍या उच्‍चवर्णियांनी जरी पाश्चिमात्त्य संस्‍कृतीतल्‍या कांही गोष्‍टी स्‍वीकारल्या असल्‍या, तरी तो संस्‍कृतींचा मिलाप समजायला हवा.

आमची संस्‍कृती नष्‍ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्‍हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्‍हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्‍या संस्‍कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्‍हणूनच आमची संस्‍कृती व आमची भाषाही नष्‍ट होण्‍याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं.
**

(पुढे चालू)

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..