नवीन लेखन...

सुखाचा शोध

सुखाच्या प्रत्येकाच्या विविध परिभाषा असतात,प्रत्येकजणाचे सुखाचे परिमाण सुद्धा वेगवेगळे असतात पण सुखाची व्याख्या खूप सोपी व छान आहे,जे समोर आहे ते जगता आल पाहिजे.

उगाच काहीतरी आपल्या आयुष्यात खूप अडचणी,टेंशन आहेत असा भाव आणून सभोवताली सुखाचा शोध घेत असलेल्या प्रियजनांच्या दुधातील मीठाचा खडा बनू नये;काही वेळा आपण सर्व गोष्टी चांगल्या असताना उगाच कुडत बसतो,जे आहे त्यात समाधान मानत नाही व नाहक इतरांशी तुलना करून जगण्याची मजा हरवून बसतो.खरचं आपणाला वाटतं तितकं जीवन अवघड आहे का हो? मला विचाराल तर, नाही.. मुळीच नाही..

एक सोपा उपाय सांगतो, तुम्ही रोज एकदा तरी स्वतःशी भेटा,अगदी एकांतात म्हणजे डोळे मिटून रोज फक्त १० मिनिटे सर्व विसरून तुम्ही कोण आहात?तुमचं अस्तित्व काय? तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव स्वतःला करुन द्या. आणि विचारा त्या अस्तित्वाला की तुझं काय अस्तित्व आहे? सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत जातील व क्षणोक्षणी तुमचा आत्मविश्वास प्रगल्भ होत जाईल…

आणि सुख म्हणजे दुसरं काय असत तर जगण्यात आत्मविश्वास असणं…

— डॉ. नितिन उत्तमराव राऊत
©NUR

 

Avatar
About डॉ. नितिन उत्तमराव राऊत 1 Article
नमस्कार मी डॉ.नितिन उत्तमराव राऊत,मला मी मराठी असल्याचा खूप अभिमान आहे.मला लहानपणापासून वाचनाबरोबरचं लिहिण्याची सुद्धा आवड आहे.मला सरळ व सोप्या भाषेत पण परखड व स्पष्टपणे अशा लिखाणावर विश्वास आहे...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..