सुखाच्या प्रत्येकाच्या विविध परिभाषा असतात,प्रत्येकजणाचे सुखाचे परिमाण सुद्धा वेगवेगळे असतात पण सुखाची व्याख्या खूप सोपी व छान आहे,जे समोर आहे ते जगता आल पाहिजे.
उगाच काहीतरी आपल्या आयुष्यात खूप अडचणी,टेंशन आहेत असा भाव आणून सभोवताली सुखाचा शोध घेत असलेल्या प्रियजनांच्या दुधातील मीठाचा खडा बनू नये;काही वेळा आपण सर्व गोष्टी चांगल्या असताना उगाच कुडत बसतो,जे आहे त्यात समाधान मानत नाही व नाहक इतरांशी तुलना करून जगण्याची मजा हरवून बसतो.खरचं आपणाला वाटतं तितकं जीवन अवघड आहे का हो? मला विचाराल तर, नाही.. मुळीच नाही..
एक सोपा उपाय सांगतो, तुम्ही रोज एकदा तरी स्वतःशी भेटा,अगदी एकांतात म्हणजे डोळे मिटून रोज फक्त १० मिनिटे सर्व विसरून तुम्ही कोण आहात?तुमचं अस्तित्व काय? तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव स्वतःला करुन द्या. आणि विचारा त्या अस्तित्वाला की तुझं काय अस्तित्व आहे? सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत जातील व क्षणोक्षणी तुमचा आत्मविश्वास प्रगल्भ होत जाईल…
आणि सुख म्हणजे दुसरं काय असत तर जगण्यात आत्मविश्वास असणं…
— डॉ. नितिन उत्तमराव राऊत
©NUR
Leave a Reply