मनाची भाषा मनास उमगते
शब्दाविना सारे काही कळते
अव्यक्त! गुज प्रीतभावनांचे
अलवार अंतरा सहजी कळते
क्षणक्षण अधीर आतुर लोचने
प्रतीक्षेत तनमन व्याकुळ होते
ध्यास , भास नि:शब्दी हळवा
आभाळ आठवांचे दाटूनी येते
घनमेघनांचे तांडव निळेसावळे
राधाकृष्णाची प्रीत सांगूनी जाते
मुरलीधराची पावरी मधुर मंजुळ
अलवार जीवाजीवास भुलविते
©️वि.ग.सातपुते.(भावकवी)
मोबाईल: 9766544908.
रचना क्र.९२.
१८ – ७ – २०२१
Leave a Reply