कुठलंही काम जड होऊन न करता आनंदाने केल्यास ते काम पूर्ण झाल्यावर आपल्याला समाधान मिळते. आपण केलेल्या कामाने जर आपणच समाधानी नसू तर, समोरच्या व्यक्तीकडून चांगल्या प्रतिक्रियेची आपण कशी काय अपेक्षा ठेवणार? जेव्हा आपण एखादं काम आनंदाने तसेच संपूर्ण न्यायाने पूर्ण केल्यास, प्रथम आपल्यालाच त्याचे समाधान मिळते व असे काम आपल्याला समोरच्या व्यक्तीकडूनही चांगली पोचपावती मिळवून देते.
म्हणूच कुठलंही काम करताना रडत सुरुवात न करता, आनंदाने आणि उत्साहाने सुरुवात केल्यास आपले काम व्यवस्थितरीत्या पार पडते. फक्त कामात स्वतःला झोकून न देता त्याबरोबर स्वतःची काळजी घेणंही तितकेच महत्त्वाचे आहे. इतरांशी सुसंवाद साधणे, कुटुंबाबरोबर वेळ घालवणे, फिरायला जाणे, सकारात्मक वाचन करणे, आपला आवडता छंद जोपासणे इत्यादी गोष्टीसाठीही जरूर योग्य वेळ काढावा.
आपल्याला मिळालेल्या ह्या सुंदर जीवनाचा आपण आनंद घेतला पाहिजे. जर आपण कामांच्या तणावामध्ये जीवन जगलो तर आपण नैराश्यामध्ये जातो व विविध शारीरिक तसेच मानसिक आजारांना निमंत्रण देऊन बसतो. तेच जर आपण करत असलेल्या कामाचा आपण आनंद घेतला तसेच आपण कामाबरोबर स्वतःची योग्य काळजी घेतली तर निश्चितच आपण आनंदी व समाधानी जीवन जगू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घ्यायला शिकले पाहिजे. नुसते यांत्रिकपणे काम न करता, त्या कामाचा आनंद घेऊन जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगाला पाहिजे. चढ – उतार हे तर प्रत्येकाच्या जीवनात येतच राहतात, पण त्यामध्ये अडकून स्वतःला निराशेच्या खोल गर्तेत न घालता, आपणच स्वतःला कामाचं योग्य वळण लावून जीवनातील प्रत्येक कार्यभाग यशस्वीपणे पार पाडू शकतो.
आपणच आपल्या कार्याने स्वतःच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीचा जेव्हा आपण आनंद घ्यायला लागू तेव्हा, मोठ्या मोठ्या गोष्टीचाही आनंद आपल्याला सहज मिळायला लागेल.
Leave a Reply