नवीन लेखन...

कोणतेही काम आनंदाने केल्यास आपल्याला समाधान मिळते

कुठलंही काम जड होऊन न करता आनंदाने केल्यास ते काम पूर्ण झाल्यावर आपल्याला समाधान मिळते. आपण केलेल्या कामाने जर आपणच समाधानी नसू तर, समोरच्या व्यक्तीकडून चांगल्या प्रतिक्रियेची आपण कशी काय अपेक्षा ठेवणार? जेव्हा आपण एखादं काम आनंदाने तसेच संपूर्ण न्यायाने पूर्ण केल्यास, प्रथम आपल्यालाच त्याचे समाधान मिळते व असे काम आपल्याला समोरच्या व्यक्तीकडूनही चांगली पोचपावती मिळवून देते.

म्हणूच कुठलंही काम करताना रडत सुरुवात न करता, आनंदाने आणि उत्साहाने सुरुवात केल्यास आपले काम व्यवस्थितरीत्या पार पडते. फक्त कामात स्वतःला झोकून न देता त्याबरोबर स्वतःची काळजी घेणंही तितकेच महत्त्वाचे आहे. इतरांशी सुसंवाद साधणे, कुटुंबाबरोबर वेळ घालवणे, फिरायला जाणे, सकारात्मक वाचन करणे, आपला आवडता छंद जोपासणे इत्यादी गोष्टीसाठीही जरूर योग्य वेळ काढावा.

आपल्याला मिळालेल्या ह्या सुंदर जीवनाचा आपण आनंद घेतला पाहिजे. जर आपण कामांच्या तणावामध्ये जीवन जगलो तर आपण नैराश्यामध्ये जातो व विविध शारीरिक तसेच मानसिक आजारांना निमंत्रण देऊन बसतो. तेच जर आपण करत असलेल्या कामाचा आपण आनंद घेतला तसेच आपण कामाबरोबर स्वतःची योग्य काळजी घेतली तर निश्चितच आपण आनंदी व समाधानी जीवन जगू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घ्यायला शिकले पाहिजे. नुसते यांत्रिकपणे काम न करता, त्या कामाचा आनंद घेऊन जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगाला पाहिजे. चढ – उतार हे तर प्रत्येकाच्या जीवनात येतच राहतात, पण त्यामध्ये अडकून स्वतःला निराशेच्या खोल गर्तेत न घालता, आपणच स्वतःला कामाचं योग्य वळण लावून जीवनातील प्रत्येक कार्यभाग यशस्वीपणे पार पाडू शकतो.

आपणच आपल्या कार्याने स्वतःच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीचा जेव्हा आपण आनंद घ्यायला लागू तेव्हा, मोठ्या मोठ्या गोष्टीचाही आनंद आपल्याला सहज मिळायला लागेल.

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..